बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते ! भाग अठ्ठेचाळीसावा

16 Mar

बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते !

भाग अठ्ठेचाळीसावा

समारोप-

मी या लिखाणात उल्लेख केलेल्या  मुद्यांची अंमलबजावणी होत नाही असे नाही. कदाचित होतही असेल.

काही महत्वाच्या विषयावर पुस्तिका काढण्यात आले होते. ही समाधानाची बाब आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना बढतीमध्ये राखीव जागा असाव्यात, या संदर्भात बी.एस.पी.ने संसदेत केलेल्या प्रयत्नाबाबत एक पुस्तिका माझ्या वाचण्यात आली होती. पण ह्या पुस्तिका महाराष्ट्रात तरी घरोघरी पोहचल्याचे मला आढळले नव्हते. कारण मला ही पुस्तिका कर्नाटकच्या एका बी.एस.पी. कार्यकर्त्याकडून मिळाली होती.

कोणी म्हणतील की, कोणतीही गोष्ट कागदावर उतरविणे फार सोपे आहे; पण प्रत्यक्षात व्यवहारात उतरविणे वाटते तेवढे सोपे नाही. हे जरी खरे असले तरी निदान त्या दिशेने वाटचाल करायला काय हरकत आहे? हे जर शक्य झाले तर  बाबासाहेबांच्या संकल्पनेचा पक्ष म्हणजे, ‘पक्षाचा सरसेनापतीसारखा नेता असावा, पक्षाचे चिन्ह हत्ती असेल, निशाण निळा असेल, अनुसूचित जाती/जमाती, इतर मागासवर्गीय यांचा सक्रीय सहभाग असावा, पक्षाचे स्वरूप व्यापक व राष्ट्रीय असावा, पक्षाचे ध्येयधोरण व तत्वाचा सातत्याने प्रचार व प्रसार व्हावा, पक्ष दलित, शोषितांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी सतत झटणारा, संघर्ष करणारा असावा.’ असा पक्ष म्हणजे बहुजन समाज पार्टीच असेल, यात तिळमात्र शंका उरणार नाही.

मी मांडलेल्या मुद्द्यांशिवाय वाचकांच्या लक्षात आलेले आणखी काही मुद्दे असू शकतात जे पक्षाच्या वाढीला सहाय्यभूत ठरू शकतील. तरी असे मुद्दे वाचकांनी जरूर समोर आणावेत.

वरील सारे मुद्दे सर्वांनाच पटावेत अशी माझी अपेक्षा नाही. व्यक्ती तितक्या प्रवृती या म्हणीप्रमाणे अनुकूल, प्रतिकूल  विचार असू शकतात. तरी या विषयाच्या अनुषंगाने सखोलपणे विचारमंथन व्हावे असे मला वाटते. जेणेकरून पक्षाला चांगले दिवसं येवून  बहुजन समाज हा देशातील सार्‍या राज्यात व केंद्रात सत्ताधारी वर्ग बनेल व त्या माध्यमातून भारत बौद्धमय बनण्यासाठी वाटचाल करेल. म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दोन्हीही संकल्पना उशिरा का होईना पण यापुढे साकार व्हायला वेळ लागणार नाही असे वाटते.

एका शायराने म्हटले आहे की,

‘माना कि इस जहॉं को गुलजार (उद्यान) न कर सके हम,

कुछ खार (काटे) तो कम कर गये गुजरे जहॉंसे हम !’

इतका जरी परिणाम या लिखाणाचा झाला तरी मला समाधान लाभेल, एवढं मात्र नक्की !

शेवटी मला अगदी अंतकरणापासून सांगावेसे वाटते की,

‘मेरे तडप का एहसास तुझको हो जाये !

मेरे ही तरह से तेरे दिल की चैन खो जाये !!

संघटीत होकर दूर करके रहेंगे अपनी गुलामी !

यही होंगी फुले-शाहू-आंबेडकर को असली सलामी !!

हि लेखमाला मी येथेच संपवितो.

जयभीम-जयभारत

आर.के.जुमळे,

अकोला

 

 

One Response to “बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते ! भाग अठ्ठेचाळीसावा”

 1. संतोष at 11:40 AM #

  सर जयभीम!
  …तुमचं समर्पित योगदान हे संशय रहित व अत्यंतिक आत्मविस्वासातुन आलेलं होतं ! सत्ता पेक्षा समता व समतेचा अत्युच्च मानबिंदू म्हणजे बुद्धमय भारत होय! ही तुमची मनोमन श्रद्धा होती,आहे हे तुमचं संपुर्ण लिखान वाचल्यावर लक्षात येतं!
  तुमची तळमळ तर अमुल्य!
  असे स्पष्ट उद्देश असलेले नेते जर संघटन वा पक्षांना भेटले असते; तर…!
  मला वाटत…;
  कांशिराम यांनी बौद्ध धम्म स्विकारला असता; वा मायावतीने ही स्विकारला असता तर; हिंदू जातीतील लोकांना ते अधिक न आवडून राजकिय नुकसान होण्याची अधिक शक्यता त्यांनी गृहित धरली असावी!
  अर्थात; हेच सत्य आहे.
  उ.प्र.सारख्या राज्याचा मुख्यमंत्री जर धर्मांतर करता…तर किती लोक धर्मांतर केले असते हा मुद्दा गौण असता; पण धम्मात तो एक मैलाचा दगड ठरला असता!
  त्यांना जे जमलं नाही; ते मोदीने योगी यांना मुख्यमंत्री करुन करुन दाखविले!
  हा…अपराध कांशिराम व मायावतींच्या नावे लिहिला जाईल!
  एका अर्थात: तुमच्या व महाराष्ट्रीय कार्यकर्त्याच्या योगदानाची फसवनुक झाली; याचं अपार दुख झालय!
  जयभीम!

  संतोष सूर्यवंशी
  संयोजक
  (संकल्पक बौद्धांचा लोकसंघ व्हावा)
  बौद्ध धम्म जनअध्ययन संघ,महा.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: