बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते ! भाग पहिला

14 Mar

बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते !

भाग पहिला……

 

‘सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही !

हर हाल मे सुरत बदलनी चाहिये !!’

 

सद्यस्थितीत भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेनुसार बहुजनांना शासनकर्ती जमात बनविणे व  भारत बौद्धमय करणे यासाठी बहुजन समाज पार्टी शिवाय दुसरा पर्यायच नाही. ही गोष्ट कुणालाही  नाकारता येणार नाही. कारण बहुजन समाज पार्टी ही ८५ टक्के बहुजनांची आहे. ज्यात अनुसूचित जाती/जमाती, अन्य मागासवर्गीय, धार्मिक अल्पसंख्यांक (मुस्लीम, बौध्द, जैन, ख्रिश्चन इत्यादी) समाज येतात. ज्यांना १०० पैकी ८५ मते मिळू शकतील, तोच पक्ष सत्तेवर राहू शकतो. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की, ज्या धर्माला राजाश्रय असेल तोच धर्म वाढत असतो. टिकत असतो. म्हणून हा पक्ष सत्तेवर आल्याशिवाय भारत बौद्धमय होवू शकणार नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

भारतातील ८५ टक्के बहुजन समाजाच्या हिताचे तत्वज्ञान घेऊन माननीय कांशीरामजी यांनी फुले-शाहू-आंबेडकरांचा राजकीय वारसा गतीमान केला, ते अविवाहित राहून आपले संपूर्ण आयुष्य बहुजन समाजाच्या कल्याणासाठी पणाला लावले. राष्ट्रीय पातळीवर फुले-शाहू-आंबेडकर चळवळ पोहचवण्याचे महान कार्य त्यांनीच  केले. त्यांनी प्रतिज्ञा घेतली की,

“मी लग्न करणार नाही. मी स्वतःची संपत्ती निर्माण करणार नाही. मी माझ्या घरी जाणार नाही. मी माझे उरलेले संपूर्ण जीवन फुले-आंबेडकरी चळवळीसाठी समर्पित करीन.”

त्यामुळे त्यावेळी आमच्या पिढीतला आमच्यासारखा तरुण व कर्मचारी वर्ग भारावून जावून त्यांच्या ‘कारव्या’त बांधिलकी आणि कर्त्यव्य भावनेने सहज सामील झाला.

माननीय कांशीरामजी यांचा उदय होण्यापूर्वी आंबेडकरी पक्ष अनेक गटात विभागल्याने त्यांची ताकद विखुरल्या गेली होती. पुणे कराराने निर्माण केलेल्या चमचा युगाने वारंवार निवडणुका लढवूनही आंबेडकरी विचाराच्या रिपब्लिकन पार्टीला यश मिळत नाही. या चळवळीच्या माध्यमातून आमदार/खासदार बनता येत नाही.  बाबासाहेबांची चळवळ चांगली आहे; पण या चळवळीच्या माध्यमातून कोणीही निवडून येऊ शकत नाही. अशी त्यांची धारणा झाल्याने ते विश्वास गमावून बसले होते. म्हणून खचून जावून आंबेडकरी अनुयायी गांधीवादी कोंग्रेसला शरण गेलेत. ज्या कॉंग्रेसला बाबासाहेब जळते घर आणि  त्यात जावून आपला विकास होणार नाही, असे म्हणत होते. त्याच घराचा आश्रय घेत होते. (एकेकाळी बी.एस.पी.ने उत्तरप्रदेशात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाचा पाठिंबा घेतला म्हणून शिव्या देत होते, भाजप व शिवसेनेसारख्या धर्माध शक्तीला दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला विजयी करा, असे म्हणणारे आर.पी.आय.वाले आमदार/खासदार/मंत्रीपदाचा मलिंदा मिळाला नाही म्हणून आता महाराष्ट्रात नाक घासत हिंदुत्ववादी भाजप व शिवसेनेच्या तंबूत शिरलेत.) हे आर.पी.आय.चे गट स्वाभिमान विसरून दुसऱ्यांच्या  ओंजळीने पाणी प्यायला मजबूर झालेत. त्यामुळे ह्या चळवळीला लाचारीपणाची झाक  येऊन मरगळल्या सारखी अवस्था झाली होती.

हे पाहून आंबेडकरी विचारधारेवर विश्वास गमावलेल्या लोकांना पर्याय देण्याच्या उद्देशाने मा.कांशीरामजींनी स्वतःची बुद्धी, पैसा, वेळ व श्रम या तत्वावर बामसेफ, डीएसफोर व बी.एस.पी.ची निर्मिती केली.

क्रमशः

 

आर.के.जुमळे,

अकोला

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: