बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते ! भाग आठवा

14 Mar

बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते !

भाग आठवा

बुद्धिजिवी वर्गाबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर “जातिभेद का उच्छेद” (Annihilation of Caste) या पुस्तकात लिहितात की, “प्रत्येक देशामध्ये बुद्धिजिवी वर्ग प्रभावशाली असतो. जो सल्ला व नेतृत्व देऊ शकतो. देशातील अधिकांश जनता विचारशील व क्रियाशील नसतात. ते बुद्धीजीवी वर्गाचे अनुकरण करून त्या मार्गाने जात असतात. म्हणून त्या देशाचे समाजाचे भविष्य बुद्धिजिवी वर्गावर अवलंबून असते. बुद्धिजिवी वर्ग चांगला किवा वाईट असू शकतात. बुद्धिजिवी वर्ग इमानदार, स्वतंत्र व निष्पक्ष असेल तर समाजाला संकटकाळी मार्ग काढून योग्य मार्गदर्शन करू शकेल. समाजाला सहाय्य करू शकेल. पथभ्रष्ट लोकांना ते चांगल्या मार्गावर आणू शकतात.”

बाबासाहेब आंबेडकरांचे असेही प्रतिपादन होते की, राजकीय, आर्थिक क्रांतीपुर्वी सामाजिक व वैचारिक क्रांती आवश्यक असते. फ्रेंच राज्यक्रांतीची पूर्वतयारी स्वातंत्र्यवादी विचारवंतांनी केली. शिवाजीच्या राजकीय क्रांतीची पूर्वतयारी भक्ती चळवळीने केली, असे न्या, रानडे म्हणतात. बाबासाहेब त्यास दुजोरा देतात. भारतातील सामाजिक क्रांतीसाठी वैचारीक क्रांतीची गरज आहे असे म्हणतात. ही वैचारीक क्रांती करण्याची जबाबदारी अंतिमतः दलित बुद्धीजीवी वर्गावर येते. त्यादृष्टीने आजच्या दलित बुद्धिजीवींच्या साहित्य, संस्कृती व राजकीय भूमिकांची दखल घेणे आवश्यक आहे. (संदर्भ-आंबेडकरांचे खरे शत्रू कोण? ले.सिद्धार्थ जगदेव)

एखाद्या पक्षाचा विस्तार कुंठीत होण्याचे एक कारण असे सांगितले जाते की, जो पक्ष त्याच्या कार्यकर्त्यांकडून, जनतेकडून, राजकीय सामिक्षाकडून होणाऱ्या चिकित्सेतून तावून-सुलाखून जात नाही. विधायक टीका-टिपणी, पूर्वग्रहरहीत समीक्षा आणि व्यापक दृष्टीकोनातून झालेली चिकित्सा ही राजकीय पक्षाच्या वाढीसाठी उपयुक्त ठरत असते.

मा. कांशीरामजी एखाद्या ज्वलंत विषयावर ठिकठिकाणी परिषदा घेऊन बौद्धिक चर्चा घडवून आणीत. त्यात शोधनिबंध सादर होत. त्या विषयावर जनमत व जागृती तयार करून आंदोलनाची दिशा ठरवीत. जसे मंडल आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करणे. तसेच भाजपच्या सत्तेच्या काळात भारतीय घटनेचे पुनर्मूल्यांकन करण्याच्या प्रयत्नाला हाणून पाडणे इत्यादी विषयावर त्यांनी परिषदा घेतल्या होत्या.

ऐवढेच नव्हेतर मा.कांशीरामजी यांनी ‘बामसेफ-एक परिचय या पुस्तिकेत संघटनेच्या यशस्वीतेसाठी ज्या १० अंगाची चर्चा केली त्यात ९ वा अंग महत्वाचे आहे. त्यात ते म्हणतात की, प्रत्येक गोष्टीची वैज्ञानिक आधारावर विश्लेषण झाले पाहिजे. त्यासाठी सर्वेक्षण, परिचर्चा, परिषदा याचे आयोजन होईल. यात बुद्धिमान व समर्पित व्यक्तिंचा समावेश असेल. ते पुढे म्हणतात की, बामसेफ जर आमच्या समाजाचे ‘बुद्धी बँक’ मानले जात असेल तर या ‘परीक्षण स्कंधा’ला बँकेचे डोके असे नाव देणे उपयुक्त होईल.

चर्चेतून विचाराची बैठक तयार होते. आणि त्या आधारे प्रश्नांचे उत्तरे शोधणे सहज शक्य होते. म्हणून वस्तुनिष्ठ चिकित्सा व कार्याची समीक्षा वेळोवेळी होणे आवश्यक आहे.

म्हणून मा. कांशीरामजी यांनी मांडलेला ‘परीक्षण स्कंधा’चा  प्रयोग आताही करण्यात यावा असे वाटते. बी.एस.पी.च्या उत्कर्षासाठी काय केले पाहिजे या विषयावर सर्वप्रथम बुद्धिवादी, मिशनरी लोकांच्या परिषदा देशाच्या कानाकोपऱ्यात घेऊन चर्चा घडवून आणावी व त्यानुसार एक सुनिश्चित कृती धोरण आखून त्या दिशेने पक्षाने वाटचाल करावी असे वाटते. या चर्चेत जे मिशनरी वृत्तीचे लोक पक्षापासून दूर गेलेत, त्यांचाही सहभाग घ्यावा. म्हणजे पक्षाबाबत त्यांच्यात आत्मीयता निर्माण होऊन उदार अंतकरणाने ते पक्षाला परत योगदान देतील. कारण हे लोक जरी सद्यस्थितीत दूर गेले असतील; तरी मा.काशीरामजी यांच्या आणि त्यांनी स्थापन केलेल्या बी.एस.पी. बद्दल ते शरीराने नसेल पण मनाने मात्र अत्यंत संवेदनशील आहेत. त्यामुळे ते निश्चितच परत जुळून पक्षाला उभारी दिल्याशिवाय राहणार नाहीत. अशा प्रक्रियेमुळे पक्षात कृतीशील विचारवंतांची फळी निर्माण होईल.

क्रमशः

आर.के.जुमळे,

अकोला

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: