बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते ! भाग सातवा

14 Mar

बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते !

भाग सातवा

आजच्या घडीला उत्तरप्रदेश शिवाय इतरही राज्यात पक्षाची पीछेहाट झालेली दिसते. त्यामुळे लखनौ नंतर दिल्ली काबीज करणे हे पक्षाचे उद्दिष्ट फलद्रूप होईल की नाही, अशी साधार भीती निर्माण झाली आहे. त्या उलट बी.एस.पी.चे कार्यक्षेत्र उत्तरप्रदेशापुरते सिमीत राहून प्रादेशिक पक्ष म्हणून अस्तित्व राहील तर नाही ना अशी पुसटशी शंका आल्याशिवाय राहत नाही.

राजकारणात पडझड तर होतच असते हे खरे आहे. हवेवर वाहत जाणारे काही पक्षाचे मतदार असतात. पण बी.एस.पी.ही ‘कॅडर बेस’ आणि समर्पित लोकांची संघटना आहे. त्यामुळे बी.एस.पी.ची पडझड ही जीवाला लागून जाते.

प्रसिध्द साहित्यिक दया पवार, आर.पी.आय.च्या  पडझडीच्या राजकारणाला जबाबदार असणाऱ्या नेतृत्वाबाबत अगदी चखपलपणे भाष्य करून समाजाला पेटून उठायला सांगतांना म्हणतात की,

‘प्रखर तेजाने तळपणारा सूर्य केव्हाच अस्तास गेला, ज्या काजव्याचा आम्ही जयजयकार केला, ते केव्हाच निस्तेज झाले. आता तुम्हीच प्रकाशाचे पुंजके व्हा… अन क्रांतीचा जयजयकार करा…!’

असे म्हणण्याची पाळी बी.एस.पी.च्या बाबतीत सुध्दा आल्यास नवल वाटणार नाही.

असं  का घडत आहे याचे चिंतन आंबेडकरी जनतेत व्हावे, असे आमच्यासारख्या एका लहानशा जुण्या मिशनरी कार्यकर्त्याला चळवळीच्या आत्यंतिक आत्मीयतेपोटी वाटणे साहजिकच आहे. या अधोगतीचे कारणे शोधून नव्या जोमाने, ताकदीने पक्षाच्या कार्याला गती  आली पाहिजे असे सर्वांनाच वाटत आहे.

मा. कांशीरामजी यांनी आणखी एक अशी मांडणी केली होती की, ‘यदी आप अपोज (oppose) करते हो, तो प्रोपोज (propose) भि करना चाहिये |’

म्हणून मी माझ्या समजुतीनुसार काही मुद्दे मांडीत आहे. त्यावर पक्षाने व नेत्यांनी महाराष्ट्राच्या व देशाच्याही दृष्टीने विचार करावे असे मला वाटते.

१. बुद्धिवादी, विचारवंत, साहित्यिक, तत्वज्ञानी लोकांचे मार्गदर्शन घेणे

बाबासाहेबांनी दि. २०.०१.१९४० च्या ‘जनता’ मध्ये लिहिले होते की, ‘गेल्या पिढीतील राजकारणात विद्वतेची जरुरी भासत असे. आजच्या राजकारणात बोटवाती-काडवाती करणारांची जरुरी भासत आहे. विद्वानांची त्यातून खड्यासारखी उचलबांगडी करण्यात येत आहे. आजचे राजकरण हे आंधळ्याच्या माळेच्या हाती गेले आहे. ही अत्यंत अनिष्ट गोष्ट झालेली आहे.’

काही अपवाद सोडले तर राजकारण म्हणजे ज्यांना रोजगार नाही अशा लोकांचे राजकारण झाले असल्याचे सर्वत्र टीका होत आहे. या लोकांनी राजकारण म्हणजे पोटा-पाण्याचा, कमाईचा धंदा बनविला असल्याचे दिसत आहे. त्यामुळे विद्वान लोक या राजकारणात पडत नसल्याचे जाणवते. ते राजकारणाच्या, चळवळीच्या व आंदोलनाच्या बाहेर राहत असल्याने बौद्धिक पराभवाचे हे ही एक कारण असेल की काय असे वाटते.

क्रमशः

आर.के.जुमळे,

अकोला

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: