बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते ! भाग पाचवा

14 Mar

बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते !

भाग पाचवा

महाराष्ट्रात बाबासाहेबांच्या चळवळीचा रथ मागे जात असल्याचे पाहून माननीय कांशीरामजी उद्विग्न होत. त्यामुळे ते बौद्धांवर तुटून पडत. (ते एखाद्यावेळी उपरोधिकपणे महार असे संबोधित असत.)  परंतु त्यांचा राग हा प्रेममूलक होता. आईच्या रागासारखा !  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुध्दा एकदा म्हणाले होते, “तुमचे मलूल चेहरे पाहून मला वाटते की तुम्ही आईच्या पोटातच का नाही मेले ? कशाला पृथ्वीला भार झालात ?”

मा. कांशीरामजी मुंबईच्या भाषणात एकदा म्हणाले होते की,

‘भाई कांशीराम, तू यहाँ पे बारबार क्यू आता है ! क्योकी जिधर-उधर हरियाली दिखेगी तब महाराष्ट्र उजडा हुवा दिखेगा, ये मुझे देखा नही जायेगा ! इस महाराष्टमे फुले पैदा हुये, शाहूजी पैदा हुये और बाबासाहेब डॉक्टर अम्बेडकर पैदा हुये. यहांसे मै सिखके गया हू ! इसीलिये मै बारबार यहां पे आता हुं !’ इतकी आत्मीयता महाराष्ट्राबाबत त्यांना होती.

म्हणून माननीय कांशीरामजीचे आवाहन स्वीकारून महाराष्ट्रातील बामसेफच्या व बी.एस.पी.च्या कार्यकर्त्यांनी दुसऱ्या राज्यातील निवडणुकीसाठी पैसा पाठविला. कार्यकर्ते पाठविले. उपाशीतापाशी राहून त्यांनी काश्मीरच्या दऱ्याखोऱ्यात खडकावर पेंटींग केली. जीवावर उदार होवून भाषणे दिलीत. हरियाणा व  उत्तरप्रदेशातील जमीनदाराच्या दहशतीला न घाबरता –

‘जयभीम का नारा गुजेगा, भारत के कोनेकोने मे’

असे म्हणत फिरलेत. उन्हातान्हात सायकल रॅलीत हिरीरीने भाग घेतला.

ऐवढेच नव्हे तर बामसेफ, बी.एस.पी.चे दिल्लीचे केंद्रीय कार्यालय महाराष्ट्रातील लोकांनी चालविले, दिल्ल्तील बोटक्लबवर वेळोवेळी झालेले आंदोलन यशस्वी करण्याचे काम महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी केले. नागपूरचे राजरतन मोटघरे व त्यांची टीम दिल्लीला जावून पेंटिंग करीत असल्याचे मी प्रत्यक्ष पाहिले आहे. बी.एस.पी.चे धोरण व रणनीती आखण्यात महाराष्ट्रातील लोकांचा महत्वाचा सहभाग होता. बी.एस.पी.ची वैचारीक प्रेरणा असलेले महापुरुष महात्मा ज्योतीराव फुले, राजश्री शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी व कर्मभूमी महाराष्ट्रच आहे. उत्तरप्रदेशात मिळालेल्या सत्तेची पायाभरणी  महाराष्ट्रातील मिशनरी कार्यकर्त्यांनी आपला स्वतःचा पैसा, बुध्दी, श्रम  आणि वेळ देवून केलेली आहे. मा. कांशीरामजींच्या कार्याचा आरंभ महाराष्ट्रापासून सुरु झाला. त्यांनी महाराष्ट्रातूनच सामाजिक आणि राजकीय प्रेरणा घेतली. महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांच्या बळावर मा. कांशीरामजींनी ही चळवळ संपूर्ण देशात पसरविली. ही गोष्ट सर्वांनाच माहिती आहे.

परंतु त्याच महाराष्ट्रातील मिशनरी कार्यकर्त्यांना व नेत्यांना  मा. कांशीरामजी पासून तोडण्याचे प्रयत्न झाले. त्यांच्या निधनानंतर तर उरल्यासुरल्या नेत्यांना-कार्यकर्त्यांना हलक्याफुलक्या कारणाने काढून टाकण्यात आले. ही सल महाराष्ट्रातील मिशनरी लोकांच्या मनात खोलवर खदखदत आहे.

मा. कांशीरामजीच्या आजारपणात व त्यांचे निधन झाल्यावर ही मिशन खतम होत असल्याचे शल्य कुर्बानी दिलेल्या त्यावेळेसच्या तरुण व आताच्या वृदत्वाकडे झुकलेल्या पिढीला सारखी बोचत आहे.

क्रमशः

आर.के.जुमळे,

अकोला

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: