बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते ! भाग चवथा

14 Mar

बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते !

भाग चवथा

मा.कांशीरामजी यांच्या आजारपणात व निधनानंतर बहुजन समाज पार्टीची झालेली वाताहात पाहून मनाला वेदना झाल्याशिवाय राहत नाही. हताश, निराश व हतबल मानसिक अस्वस्थेत सापडलेला निष्ठावान अनुयायी पाहून मनात कालवाकालव होणे स्वाभाविकच आहे. त्यामुळे मनातला उद्वेग बाहेर येऊन या विषयावर लिखाण केल्याशिवाय  मला राहवले नाही.

अनेक लोकांनी नोकरीत कार्यरत असतांना  ऐन उमेदीच्या काळात बी.एस.पी. संबंधित बामसेफ व पे  बॅक टू सोसायटी प्रोग्रॅम (पि.बी.एस.पी.) या संघटनेत निष्ठेने, प्रामाणिकपणे व समर्पितपणे काम केले आहे. त्यात मी सुध्दा होतो, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. या संघटनेला व बी.एस.पी.ला वेळ, पैसा व बुद्धी देऊन मिशनरी वृतीने काम केल्याबद्दल आम्ही धन्य झालोत. नोकरीच्या कार्यालयीन वेळा सोडल्या तर इतर वेळी किंवा सुट्ट्यांच्या दिवशी किंवा प्रसंगी गरज भासल्यास सुट्ट्या काढून आम्ही या चळवळीचे काम झपाटल्यासारखे तहान-भूक विसरून करीत होतो, हे नमूद करतांना आमचा उर अभिमानाने भरून येत आहे.

केवळ कर्मचारीच वर्गच या चळवळीत सामील झाला असे नाही तर त्यांचे कुटुंबीय सुध्दा मा. कांशीरामजी यांच्या ‘कारव्या’त सामील झाला. बामसेफ ही संघटना अराजकीय, अधार्मिक व कर्मचाऱ्यांना सरकारी नियमांचे बंधन असल्याने सामील होऊ शकत नसल्याने, त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना डी.एस.फोर या संघटनेच्या व नंतर बी.एस.पी.च्या माध्यमातून या चळवळीत उतरविले. कुटुंबीय सुध्दा निस्वार्थ भावनेने या चळवळीत समर्पित झाले.

या चळवळीला प्रसंगी प्रॅाव्हिडंट फंड, सोसायटीचे कर्ज काढून पैसा पुरविण्यात आम्हाला त्यावेळी मोठा उत्साह वाटत होता. मी तर माझी बदली कोकणात झाली; तेव्हा तेथे कार्यकर्त्यांचा संच तयार होईपर्यंत दरमहा मनिऑर्डरने पैसे नागपूर येथील बी.एस.पी. कार्यालयाला पाठवित होतो.

मी दीड महिना सुट्ट्या काढून दिल्ली येथील बी.एस.पी.च्या मुख्य कार्यालयात मा. बावाजी मेश्राम यांच्या आधिपत्याखाली मार्च १९९१ च्या दरम्यान काम केले आहे.

म्हणून  मला बहुजन समाज पार्टी बद्दल आज काय वाटत आहे, याबाबत प्रांजळपणे मते मांडण्याचा थोडाफार तरी अधिकार पोहोचतो. म्हणूनच या लिखाणाकडे टीकेच्या दृष्टिकोनातून म्हणजे दाईच्या भावनेने  न पाहता सकारात्मक दृष्टीने म्हणजे आईच्या भावनेने पाहावे, अशी माझी माफक अपेक्षा आहे.

क्रमशः

आर.के.जुमळे,

अकोला

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: