बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते ! भाग तिसरा

14 Mar

बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते !

भाग तिसरा

मा. कांशीरामजींनी संपूर्ण भारत पिंजून काढला. सभा, संमेलन, परिषदा, आंदोलने, कॅडर कॅम्प, सायकल मार्च, रॅली, परिवर्तन रॅली  इत्यादी मार्गाद्वारे बहुजन समाजात जोश आणि उत्साह भरला. त्यांची दूरदृष्टी व शास्त्रशुद्ध पायावर आधारीत नेतृत्वामुळे या चळवळीला भक्कम अशी उभारी मिळाली.

त्यामुळे ही पार्टी अल्पावधीतच देशात तिसऱ्या क्रमांकावर जावून पोहचली. आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून सुध्दा आमदार, खासदार निवडून येऊ शकतात. हे मा. कांशीरामजी यांनी सिध्द करून दाखविले. ऐवढेच नव्हे तर मंत्री बनवून सरकार सुध्दा चालवू शकतात. हे उत्तरप्रदेशच्या उदाहरणाने सिध्द करून दाखविले.

उत्तरप्रदेशच्या सत्तेसाठी भाजपाचा आधार घेतला; तेव्हा संधीसाधूपणाची प्रखर टीका होवूनही ते कधी डगमगले नाहीत. उलट ‘हो मी संधीसाधू आहे. केवळ संधीसाधू नाही तर मोठा संधीसाधू आहे. आम्हाला कधी संधीच मिळत नव्हत्या. म्हणून मिळालेल्या संधीचा मी फायदा घेणारच. जर संधी मिळाली नाही तर निर्माण करू.’ असे म्हटल्याने विरोधकाचे कायमचे तोंड बंद झालेत. पुढे ते असेही म्हणत की, ‘जो पर्यंत आमची सत्ता येत नाही तो पर्यंत अस्थिर सरकार राहील. मजबूत सरकार मजबुतीने आमचा गळा घोटतात. म्हणून आम्हाला मजबूत नव्हे तर मजबूर सरकार पाहिजे. त्यामुळे आम्हाला निवडणुकीची वारंवार संधी मिळेल.’

कोणत्याही चळवळीचे मोजमाप हे त्या चळवळीच्या  राजकीय यशापयशाचे आलेखावरून ठरविल्या जाते. कॉग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेस हे गांधीवादी विचार, भाजप-शिवसेना हे  हिंदुत्ववादी विचार तर भारतीय कम्युनिस्ट पक्ष हे साम्यवादी विचार घेऊन निवडणूका  लढवीत असतात. हे पक्ष निवडणूक जिंकतात; तेव्हा तो विचार दृढ होत आहे, असे समजले जाते. बी.एस.पी.ला जेव्हा निवडणुकीत यश मिळत गेले; तेव्हा फुले-आंबेडकरी विचारधारा वाढत आहे, असे संकेत मिळायला लागले. याचा अर्थ मा. कांशीरामजी यांनी गांधीवाद, समाजवाद, मार्क्सवाद, हिंदुत्ववाद याच्या पलीकडे जावून आंबेडकरांच्या बहुजनवादाला शिखरावर नेवून ठेवले.

त्यांना आता बाबासाहेबांच्या दुसऱ्या स्वप्नाची पूर्तता करावयाची होती. त्यांना सम्राट अशोकाचा भारत निर्माण करायचा होता.

बहीण मायावतीनी ‘संसद भवन – केंद्र की सत्ता का मंदिर’ या पुस्तिकेत लिहिल्याप्रमाणे मा. कांशीरामजींना धर्मांतराच्या सुवर्ण महोत्वसी वर्षात म्हणजे १४ ऑक्टोबर २००६ मध्ये ३ कोटी लोकांना सोबत घेऊन बौद्ध धम्म स्वीकारणार असल्याची घोषणा केली होती. तथापि त्यापूर्वी त्यांनी केंद्राची सत्ता हस्तगत करण्याची पूर्ण योजना आखली होती.

पण त्यापूर्वीच ते २००३ साली ब्रेन स्टोकने आजारी पडलेत. ९ ऑक्टोबर २००६ रोजी त्यांचे निधन होईपर्यंत ते आजारातून उठलेच नाहीत. त्यामुळे त्यांची धर्मांतराची घोषणा फलद्रूप झाली नाही.

क्रमशः

आर.के.जुमळे,

अकोला

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: