बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते ! भाग एकतिसावा

14 Mar

बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते !

भाग एकतिसावा

२१. सहकारी, शैक्षणिक संस्थेत भाग घेणे

जेथे जेथे लोकाचा संबंध येतो त्या त्या ठिकाणी बी.एस.पी.ने आपली माणसे पेरले पाहिजेत. सद्या देशात सहकारी संस्थेचे फार मोठे जाळे खेड्यापाड्यात व शहरात सर्वदूर पसरले आहे. जंगल सोसायटी, मजूर सोसायटी, दुध संकलन सोसायटी, दुध संघ, खरेदी-विक्री संघ, पत पुरवठा सोसायटी असे अनेक प्रकारच्या सोसायट्या खेड्यापाड्यात व शहरात कार्यरत असतात.  महिलांचे बचत गट पण ठिकठिकाणी कार्यरत झालेले आहेत. ह्या संस्था त्यांच्या सभासदांना सोयी-सुविधा पुरवीत असतात. यात आर्थिक हितसंबंध गुंतलेले असतात. या सोसायट्यात  कॉग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेसचे पाळेमुळे खोलपर्यंत रुतलेले आहेत. त्याद्वारे निवडणुकीवर प्रभाव टाकीत असतात. तसेच यावर काही लोकांचे गुजराण होत असते. म्हणून बी.एस.पी.ने या माध्यमाचा फायदा मतदार बांधण्यासाठी आणि कार्यकर्त्याच्या गुजराणसाठी करून घ्यावा.

तसेच भारतातील दलित, शोषित समाजाला आपले शोषण संपविण्यासाठी स्वत:ची अर्थव्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. श्रीमंत लोक नोटांनी व्होट विकत घेतात. याला प्रामुख्याने गरीब लोक बळी पडतात. म्हणून आत्मनिर्भर आणि स्वावलंबी होण्यासाठी सहकारीतेचा आधार घेणे हा एक मार्ग आहे. भारतातील बहुजन समाज हा फार मोठा उपभोक्ता वर्ग आहे. त्यामुळे फार मोठी उलाढाल करण्यास हा वर्ग सक्षम आहे.

पूर्वी बामसेफ संघटनेच्या जडणघडणीत सहकाराचा अंतर्भाव होता. आताही या मुद्याकडे लक्ष द्यावे असे वाटते.

२२.   शैक्षणिक संस्था निर्माण करणे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संपूर्ण देशात शिक्षणाचे जाळे पसरविले आहेत. प्ले ग्रुप –आंगणवाडी-प्राथमिक शाळापासून ते महाविद्यालयीन शाळेपर्यंत इंग्रजी, मराठी व इतर प्रादेशिक भाषेत शिक्षण देण्यासाठी त्यांनी जागोजागी संस्था स्थापन केलेल्या आहेत. खेड्यापाड्यापासून ते शहरापर्यंत ह्या संस्था कार्यरत आहेत. त्यामुळे ते मुलांच्या बालवयापासूनच हिंदुत्वाचे संस्कार त्यांच्यावर बिंबवीत असतात. लहान वयात केलेले संस्कार नंतरच्या जीवनात लवकर मिटत नसतात. याचाच फायदा त्यांना देशाच्या निवडणुकात मिळत असतो. त्यामुळे साक्षी महाराज, उमा भारती, निरंजन ज्योती सारखे साधू-साध्वी निवडून येवू शकतात आणि मंत्री पण बनू शकतात. मग हे सत्तेच्या माध्यमातून हिंदुत्वाचा प्रचार करीत असतात.

तसेच शैक्षणिक संस्थेतील शाळा, कॉलेज, वसतिगृह यात सुध्दा मुलं व पालक वर्गाचा संबंध येत असतो. तेव्हा या क्षेत्रात सुध्दा बी.एस.पी.ने आपला शिरकाव  करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून शिक्षणसंस्थाचे जाळे सर्वदूर पसरविले पाहिजे. त्याचप्रमाणे ग्रामीण क्षेत्रातून शहरी भागात शिक्षणासाठी येणाऱ्या मुलांमुलींसाठी वसतिगृहे काढून त्यांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था केली पाहिजे. कारण शहरात खोली करून राहणे व बाहेरचे जेवण घेणे फारच खर्चिक असते. हा खर्च ग्रामीण विद्यार्थ्यांना झेपत नाही. ही सोय जर पक्षाने किंवा पक्षाशी संबंधीत नेत्याने किंवा कार्यकर्त्यांनी माफक खर्चात मोठ्या प्रमाणात केली तर ग्रामीण क्षेत्रातील मुलांमुलींचा महाविद्यालय व उच्च शिक्षणासाठी फार मोठा ओढा वाढेल. आणि त्यामुळे बहुजन समाजात उच्च शिक्षणाचा प्रचार व प्रसार होवून रोजगार मिळविण्यास मदत होईल.

आम्ही शाळा शिकत असतांना वसतिगृहात राहत होतो. निवडणूक आली की संचालक आम्हाला कांग्रेसचा प्रचार करण्यासाठी आपापल्या गावाला पाठवून देत होते. वसतिगृहाचे चालक विद्यार्थ्यांचा असाही उपयोग करून घेत असत.

क्रमशः

आर.के.जुमळे,

अकोला

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: