बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते ! भाग दुसरा …

14 Mar

बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते !

भाग दुसरा …

बी.एस.पी.च्या स्थापनेमागील उद्देश स्पष्ट करतांना मा.कांशीरामजी म्हणाले होते की, ‘भारतीय घटनेने स्वीकृत केलेले राजकीय समानते सोबतच सामाजिक आणि आर्थिक समानता यावी, अशी आमची इच्छा आहे.’ फुले-आंबेडकर चळवळीला गतिशीलता प्रदान करणे हा त्यांचा  बी.एस.पी. स्थापन करण्यामागचा आणखी एक उद्देश होता.

बाबासाहेबांची दोन महास्वप्ने अपुरी राहिली. एक शासन सत्ता हस्तगत करणे व दुसरी भारत बौद्धमय करणे. या महास्वप्नाच्या पूर्ततेसाठी मा.कांशीरामजींनी एक सशक्त मिशनरी टीम उभी केली. या मिशनमध्ये आमच्यासारख्या एका संपूर्ण पिढीने आपले तारुण्य कुर्बान करून या मिशनमध्ये झोकून दिले.

‘बाबा तेरा मिशन अधुरा, बी.एस.पी.करेगा पुरा’

अशी घोषणा देऊन बाबासाहेबांच्या स्वप्न पूर्ततेसाठी वाटचाल सुरु झाली. सारा भारत ढवळून निघाला. म्हणून लोकांनी न थकता घोषणा देणे सुरु केले की,

‘कांशीराम तेरी नेक कमाई, तूने सोती कौम जगाई !’

देशातील बुद्धिवादी वर्ग त्यांच्या भूमिकेमुळे खडबडून जागा झाला. त्यांनी खडतर ध्येयाच्या पूर्ततेसाठी पैसा, बुद्धी व वेळ ही साधनसामुग्री एकत्र करून फुले-आंबेडकरी मिशनला पुढे नेणारी ६ डिसेंबर १९७३ ला संकल्पित केलेल्या व ६ डिसेंबर १९७८ रोजी जन्माला घातलेल्या बामसेफ या संघटनेत झोकून दिले, या चळवळीच्या पाठीशी सारी शक्ती लावली. जातीच्या आधारावर तोडलेल्या साडेसहा हजार जातींना जोडून बहुजन समाज निर्माण करण्यासाठी आमची पिढी झपाटून गेली होती. जातीजातीत तोडलेल्या बहुजन समाजाला जागृत करून एका सूत्रात बांधण्याची प्रक्रिया मोठ्या जोमाने सुरु झाली.  काही राज्यात त्याचा परिणाम दिसून आला. सत्तेकडे वाटचाल सुरु झाली. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, काश्मीर, हरियाणा, हिमाचलप्रदेश, बिहार, राजस्थान, पंजाब इत्यादी राज्यात पक्षाला मान्यता मिळाली. त्यामुळेच बहुजन समाज पार्टीला अगदी अल्पावधीतच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला. बाबासाहेबांचा हत्ती चिन्ह ज्या आर.पी.आय.ने गमावला होता, तो परत मिळविला. नंतरच्या काळात निवडणूक आयोगाने सर्व प्राण्यांचे चिन्ह रद्द केले. पण हत्ती या प्राण्याचे चिन्ह बी.एस.पी.ने राखीव केल्याने हे चिन्ह कायम राहिले. बाबासाहेबांची एक फार मोठी आठवण सुरक्षित ठेवली. ही मा. कांशीरामजी व बी.एस.पी.ची फार मोठी उपलब्धी आहे, असेच म्हणावे लागेल. मा.कांशीरामजी आपल्या ध्येयाबाबत सुस्पष्ट होते. बहुजन समाजाला शासनकर्ती जमात बनविण्याचा एकच ध्यास त्यांनी घेतला होता.

क्रमशः

आर.के.जुमळे,

अकोला

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: