बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते ! भाग सव्वीसावा

14 Mar

बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते !

भाग सव्वीसावा

मा. कांशीरामजी पण क्वालालंपूरच्या भाषणात म्हणाले होते की, ‘जातीविहीन समाज निर्माण करण्यासाठी शासक बनणे आवश्यक आहे. तेव्हाच नवीन समाजाची निर्मिती करणे शक्य होईल.’ काय बहुजन समाज पार्टीच्या या उद्दिष्टासाठी ब्राम्हण समाज सहकार्य करतील असे वाटते? काय एकट्या उत्तरप्रदेशात ब्राम्हणवर्गाच्या सहकार्याने सत्ता आली होती म्हणजे सामाजिक परिवर्तनाचे हे उद्दिष्ट्य सफल झाले होते काय? त्यासाठी राज्याराज्यांत आणि दिल्लीची केंद्रीय सत्ता काबीज करणे आवश्यक नव्हती काय?

येथे आणखी एक गोष्ट नमूद करणे अवाजवी  ठरणार नाही. बाबासाहेबांच्या मजबूत संघटनेकडे पाहून वल्लभभाई पटेल म्हणाले होते की, ‘संघटना असावी तर डॉ. बाबासाहेबांसारखी.’ त्यावर बाबासाहेब म्हणाले होते की, ‘तुम्ही या संघटनेमध्ये बिघाड होऊ देऊ नका. हंडाभर दुध नुसत्या मिठाच्या खड्याने नासते.’ (जनता दि.२३.०७.१९३८) तेव्हा ब्राम्हणवर्गाच्या शिरकाव्यामुळे (परिवर्तनवादी ब्राम्हण  सोडून) पक्ष नासणार तर नाही ना, याची काळजी घ्यायला नको का ?

तसेच राजश्री शाहू महाराजांनी दि. २० व २१ मार्च १९२०च्या माणगाव परिषदेत जे सांगितले होते, तेही लक्षात घेणे आवश्यक आहे. ते म्हणाले होते की, ‘आतापर्यंत आम्ही निकृष्ट अवस्थेत पोहचण्याचे कारण आम्ही आमचा योग्य पुढारी योजून काढत नाही. गोड बोलून नावलौकिक मिळविण्याच्या हेतूने आमच्यापैकी काही आपलपोटी मंडळी अयोग्य पुढारी नेमून देऊन अज्ञानी लोकांना फसवितात. पशुपक्षी देखील आपल्याच जातीचा पुढारी करितात. पक्षात कधी चतुष्पादाचा पुढारी झाला नाही. चतुष्पादी कधीही पक्षाचा पुढारी नसतो. गाय, बैल, मेंढरे यात मात्र धनगर त्यांचा पुढारी असतो. त्यामुळे शेवटी त्यांना कत्तलखान्याकडे जावे लागते.’ यदाकदाचित भविष्यात पक्षाचा पुढारी जर एखादा ब्राम्हण झाला तर आपली गत राजश्री शाहू महाराज सांगतात तशी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भीती वाटणे साहजिकच आहे.

हजारो वर्षापासून ज्या मनुवाद्याचे मन परिवर्तन झाले नाही, त्यांच्यात बहीण मायावतीच्या ‘सोशल इंजिनिअर’च्या सूत्राने एकाएकी कसा बदल झाला होता याचे आश्चर्य वाटते !  ज्या ब्राम्हणवादाविरुद्ध बहीण मायावती संघर्ष करीत होत्या, त्याच वर्गाला आपल्या पक्षात सामावून घेत होते, याला काय म्हणावे?

क्रमशः

आर.के.जुमळे,

अकोला

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: