बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते ! भाग पंचवीसावा

14 Mar

बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते !

भाग पंचवीसावा

मा.कांशीरामजींनी घोषणा केली होती की, ‘१४ ऑक्टोबर २००६ रोजी धम्मदीक्षेच्या ५०व्या वर्षी मी ३ कोटी लोकांसोबत बौध्द धम्माचा स्वीकार करेन.’ पण त्यानंतर ते आजारी पडल्याने ती घोषणा फलद्रूप झाली नाही. म्हणून त्यांची ही घोषणा पक्षातील कुणीही नेत्याने फलद्रूप करू नये म्हणून तर ब्राम्हणवर्ग तशी आखणी करीत नव्हती ना अशी शंका येत आहे.

शिवाय ब्राम्हणवर्गाचे पक्षावर वाढणार्‍या वर्चस्वामुळे मुस्लीम समाज सुध्दा दुरावल्या जाण्याची भीती निर्माण झाली. एकवेळ ब्राम्हण वर्ग जवळ नाही आला तरी चालेल पण मुस्लीम वर्गाला तोडणे पक्षाला परवडणारे नाही. कारण उत्तरप्रदेशात जरी ब्राम्हणवर्गाची  संख्या ९.२ टक्के असली तरी देशात मात्र केवळ ३.५ टक्के आहेत तर मुस्लीम वर्ग हा उत्तरप्रदेशात १८.२ टक्के तर देशात ११.६७ टक्के आहेत. म्हणजे ब्राम्हण वर्गापेक्षा मुस्लिमांची संख्या जास्त आहे.

ब्राम्हणवर्गाची स्वत:ची संघटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व जवळचा पक्ष म्हणजे भाजप व दुसरा पर्यायी पक्ष म्हणजे कांग्रेस आहे. मुस्लिमांना स्वतःचा असा देशव्यापी पक्ष नाही. ब्राम्हण वर्ग हा कधीही बसपा सोबत ईमानदारीने व निष्ठेने राहू शकेल असे वाटत  नाही. बी.एस.पी.ची विषमतेवर आधारीत हिंदुत्व विरोधी विचारधारा असल्याने मुस्लीम समाज पक्षाशी सहज जुडू शकतात. बहुजन समाजातील ओबीसी, आदिवासी व विमुक्त-भटके जमातीतील लोकांचा हिंदूमधील  धर्मांध वर्ग म्हणजेच प्रामुख्याने मनुवादी  वर्ग मुस्लिमाच्या विरोधात आजपर्यंत सैनिक म्हणून वापर करीत आला आहे. हा वर्ग जर मुस्लीमासोबत मित्रत्वाने वागायला लागला तर दंगली पेटणारच नाहीत. म्हणून मुस्लीम वर्ग बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करणार्‍या  बसपासोबत गुण्यागोविंदाने राहू शकतील यात काही शंका वाटत नाही.

१९९५ मध्ये बी.एस.पी. उत्तरप्रदेशात सत्तेवर असतांना विश्व हिंदू परिषदेला मथुरा येथे कृष्णाचा वाढदिवस साजरा करू दिला नाही. कारण तेथे मस्जिद होती. आणि बाबरी मस्जिद नंतर ही मस्जिद पाडण्याचा त्यांचा मनसुबा होता. त्यामुळे मुस्लीम वर्ग बहीण मायावतीवर त्यावेळी खूष झाला होता. म्हणून मुस्लीम वर्ग हा बी.एस.पी. जवळ निश्चितच राहू शकतो.

बाबासाहेबांनी मनमाड येथील रेल्वे कामगारांच्या परिषदेत म्हटलेच होते की, ब्राम्हणशाही व भांडवलशाही हे कामगारांचे दोन शत्रू आहेत.  ह्या वर्गाने स्वत:च्या वर्चस्वासाठी इतरांवर अन्याय केल्याचे इतिहासात नमूद झाले आहे. या व्यवस्थेने निर्माण केलेल्या जाती संस्थेने केवळ अस्पृश्यांच्याच जीवनाचा विध्वंस केला असे नाही, तर तिच्यामुळे संपूर्ण भारत देशच उध्वस्त झाला आहे. ही गोष्ट कशी विसरता येईल?  म्हणून भारतीय इतिहासातील संघर्ष ब्राम्हण  विरुध्द ब्राम्हणेतर असाच आहे. त्याला आणखी पुरावा देण्याची गरज नाही. तरी विषाची परीक्षा पुन:पुन्हा करणे योग्य होणार नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २१.१०.१९५१ रोजी पटियाला येथे दिलेल्या भाषणाची आठवण करून देऊ इच्छितो. ते कॉंग्रेसच्या बाबतीत बोलले होते की, ‘काय मांजर आणि उंदीर कधी एकत्र राहू शकतात? तसेच बनिया आणि शेतकरी एकत्रितपणे शांतीपूर्ण राहू शकतील? हाच प्रश्न ब्राम्हण वर्ग आणि अस्पृश्य वर्गयांनाही लागू होतो. ब्राम्हणवर्ग पाहतील की अस्पृश्यांना खालच्यातील खालच्या स्तरावर कसे ठेवता येईल. त्यांना कोणताही अधिकार मिळू नये असा प्रयत्न ते करतील. माणुसकीचे अधिकार देणार नाहीत. मग शोषक आणि शोषित, अत्याचारी आणि अत्याचारग्रस्त कोणत्यातरी राजनैतिक पक्षात एकत्र नांदू शकतील काय? म्हणून सर्व शोषित, पिडीत, दलित वर्गासाठी एक अलग आणि स्वतंत्र पक्ष असणे आवश्यक आहे. नाहीतर या वर्गाचा सत्यानाश होईल.’

तसेच गं.बा.सरदार यांच्या ‘गांधी आणि आंबेडकर’ या पुस्तकात उल्लेख आला आहे की, ‘कॉंग्रेस ही शोषक आणि शोषितांची आघाडी आहे आणि हे निश्चित आहे की, कॉंग्रेसमधील शोषक वर्ग कॉंग्रेसला बहुजनांच्या हितार्थ कार्य करू देणार नाही. राजकीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी शोषक आणि शोषितांच्या ऐक्याची गरज असेलही; परंतु समाजाच्या पुनर्रचनेसाठी शोषक आणि शोषितांनी एकाच पक्षात काम करणे म्हणजे बहुजनांची फसवणूक होय.’ असे बाबासाहेबांनी म्हटले आहे.

तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या इशारावर लक्ष देऊन आपण धोरण ठरविणे योग्य होणार नाही काय?

क्रमशः

आर.के.जुमळे,

अकोला

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: