बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते ! भाग चोवीसावा

14 Mar

बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते !

भाग चोवीसावा

१४.  ब्राम्हणवर्गाच्या सहभागाबाबत

बहीण मायावती उत्तरप्रदेशात ‘सोशल इंजिनियर’च्या नावाने सतत ब्राम्हणवर्गाचे मेळावे घेऊन त्यांचेशी सलगी वाढवीत होते. ‘ब्राम्हण दलित भाई भाई’ अशा घोषणा देऊन, भाईचारा समित्या स्थापन करून व ब्राम्हण जोडो संमेलन घेऊन बी.एस.पी.मध्ये मोठ्या प्रमाणात शिरकाव करून घेत होते. ऐवढेच नव्हे तर विधानसभेच्या सर्व मतदारसंघात ब्राम्हणांना भाईचारा समित्याचे  अध्यक्ष, उपाध्यक्ष  व दलितांना सचिव बनविण्यात आले. ब्राम्हण संमेलनात बहीण मायावतीला ब्राम्हण दैवत असलेले व क्षत्रियांचे कर्दनकाळ ठरलेले परशुराम यांची कुऱ्हाड भेट देण्यात आल्याचे नमूद ‘आधुनिक भारतातील दलित’ या पुस्तकात करण्यात आले होते.

ब्राम्हणवर्गाला बी.एस.पी.त वळण्याचे कारण काय? याचे विश्लेषण करतांना असे सांगितले जाते की, १९५२ च्या पहिल्या संसदेत ब्राम्हण वर्गाचे ३३० खासदार होते. परंतु ही संख्या रोडावत आता ५०-६० वर येऊन ठेपली आहे. म्हणून जिंकणाऱ्या प्रत्येक पक्षात आपले जात वर्चस्व अबाधित राहण्यासाठी आपले जास्तीत जास्त खासदार असावेत असा त्यांचा प्रयत्न असतो. म्हणून हा वर्ग सर्व बास्केट मध्ये अंडे घालून ठेवतात, जेणेकरून कोणत्या ना कोणत्या बास्केटमध्ये अंडी उबवल्या जातील अशी त्यांना खात्री असते.  हे एक कारण आहे. दुसरे कारण असे की, त्यांचे नैसर्गिक नात्यागोत्याचे पक्ष असलेले भाजप व कॉंग्रेस यांचा जनाधार उत्तरप्रदेश मध्ये कमालीचा घसरला होता. त्यामुळे त्यांचेसमोर दोन विकल्प होते. एकतर त्यांनी हजारो वर्षे वंचित करून ठेवलेल्या बहुजनांच्या पक्षाला समर्पित होवून स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न करणे किंवा हिंदुत्ववादी राजकारणाला वाढवून आपले अस्तित्व शाबूत ठेवणे. यात त्यांनी पहिला पर्याय स्वीकारलेला दिसतो. कारण ते स्वतंत्रपणे सत्तेत राहण्याच्या परिस्थितीत नाही याची त्यांना जाणीव झाली होती. म्हणूनच ते बहुजन समाज पार्टीकडे वळले होते असा अनुमान होता. यालाच बहीण मायावतीने ‘सोशल इंजिनीअर’ असे नाव दिले.

असेही सांगितले जाते की, ज्या ब्राम्हण उमेदवारांना  भाजपाने निवडणुकीच्या तिकीटा दिल्या नाहीत आणि मुलायमसिंहच्या समाजवादी पक्षात गुन्हेगार वृत्तीच्या व क्षत्रियांच्या तुलनेत दुय्यम स्थान दिल्या जाणाऱ्या भीतीने नाही भाजपात राहू शकत की समाजवादी पक्षात जाऊ शकत. म्हणून नाईलाजाने ते बहुजन समाज पार्टीकडे तिकिटासाठी आले होते. अर्थात ही त्यांची मजबुरी होती. त्यांनी जर २००७ ची उत्तरप्रदेशची निवडणूक जिंकून दिली, असे समजले तर मग २०१२ ची विधानसभेची व २०१४ची लोकसभेची निवडणुक का नाही? की याचा उलटा परिणाम झाला तो म्हणजे मुस्लीम वर्गाने आपली मते मुलायमसिंहच्या समाजवादी पार्टीकडे वळवली तर नव्हती ना?

तसेच बी.एस.पी.त शिरून बी.एस.पी.ची चळवळ ते काबीज (हायजॅक) तर करणार नाही ना अशी साधार भीती लोकांमध्ये निर्माण झाली होती. कारण मनुवादी षडयंत्र राबवितांना असे सांगितले जाते  की, विरोधी चळवळीची  पहिल्या पायरीवर  ते दखल घेत नाहीत. तरीही जर ती चळवळ वाढत असेल तर दुसऱ्या पायरीवर त्या चळवळीला साम, दाम, दंड, भेद नीती वापरून नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करतात. तरीही जर ती चळवळ वाढण्याचे थांबत नसेल तर तिसऱ्या पायरीवर त्या चळवळीचा स्वीकार केल्या जाते. त्या चळवळीला  दुषित करण्याचे काम करून बदनाम केल्या जाते. मग ती चळवळ हळूहळू खतम होत जाते. अशी अवस्था बी.एस.पी.ची झाली असे म्हटले तर वावगे होणार नाही. शिवाय ह्या वर्गाने बी.एस.पी.सोबत जुळलेला जनाधार तोडून भाजपकडे वळविण्याचे काम तर केले नाही ना?

क्रमशः

आर.के.जुमळे,

अकोला

 

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: