बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते ! भाग तेविसावा

14 Mar

बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते !

भाग तेविसावा

१३. कार्यकर्ता

समाजक्रांती यशस्वी करण्यासाठी नेता आणि कार्यकर्ता या दोन दुव्यांची अत्यंत आवश्यकता आहे. नेत्याला डोके म्हणता येईल तर कार्यकर्त्याला पाय म्हणता येईल. पक्षाचे, नेत्याचे, चळवळीचे विचार लोकांपर्यंत पोहोचविणारा घटक म्हणजे कार्यकर्ता. कार्यकर्त्याशिवाय चळवळ चालू शकत नाही. म्हणून पक्षात सतत निस्वार्थ, निष्ठावान,  चिकाटीचा, सचोटीचा, प्रामाणिक, प्रांजळ, निस्पृह, सहनशील, खंबीर, हिंमतवान, धीराचा, शारीरिक क्षमतेचा, ध्येयशील असा कार्यकर्ता घडविण्याची प्रक्रिया सुरु असली पाहिजे. पक्ष अशा कार्यकर्त्यांनी गजबजून गेला पाहिजे. कार्यकर्त्यांचे जाळे सर्वदूर पसरले पाहिजे. चळवळीचे भवितव्य कार्यकर्त्याच्या कुशल कार्यावर अवलंबून असते.

कार्यकर्त्यामध्ये सहनशीलता आणि धीर हे दोन गुण असणे आवश्यक आहे. भगवान बुध्द भिक्खूना म्हणाले होते की, ‘जग जरी आपल्यासोबत भांडले तरी आपण त्यांचेशी भांडू नये. सत्य शिकविणारा कधीही भांडत नसतो.’

समाजाने सुध्दा अशा कार्यकर्त्याची किंमत केली पाहिजे. त्यांचे मनोध्येर्य खचू द्यायला नको. तो वैफल्यग्रस्त होणार नाही याची काळजी समाजाने व पक्षाने घेतली पाहिजे. कार्यकर्त्यांच्या त्यागाचे चीज व्हायला पाहिजे; तरच तो टिकून राहील.

कार्यकर्ता हा चळवळीच्या रथाचा चालक असतो. तो महत्वाचा घटक आहे. चळवळीजवळ कितीही प्रभावी विचार असला तरी त्याला कार्यकर्त्याचा आधार मिळाल्याशिवाय तो विचार समाजापर्यंत पोहोचणार नाही. म्हणून बाबासाहेब म्हणायचे की, रोपट्याला जिवंत ठेवण्यासाठी जसे पाणी आणि खत दिल्या जाते, तसेच विचाराचा प्रचार आणि प्रसार झाल्याशिवाय तो विचार जिवंत राहणार नाही. आणि हे कार्य कार्यकर्ताच करू शकतो. नेता जसा चळवळीचा प्राण असतो, तसाच कार्यकर्ता सुध्दा चळवळीचा प्राण असतो. म्हणून बाबासाहेब म्हणायचे की, ‘YOU MUST BE ABLE TO CREATE DEVOTED WORKERS.’

भगवान बुद्धांच्या धम्माचा कार्यकर्ता म्हणजे भिक्खू संघ ! भगवान बुद्धांनी त्यांना ‘चरथ भिक्खवे चारिकं, बहुजन हिताय बहुजन सुखाय’ असा आदेश दिला होता. म्हणजेच ‘बहूजनांच्या हितासाठी, बहूजनांच्या सुखासाठी भिक्खुनो चारही दिशेने

फिरा !’

कबीर पण म्हणायचे की,

‘कबीरा खडा बजार मे, लिये लुकाठी हाथ !

जो घर फुके अपना, चले हमारे साथ !!’

म्हणजेच  आपले घरदार सोडून निघालेला कार्यकर्ता हा कबीराचा समाजसेवक होता !

कार्यकर्ता हा जन्माला येत नाही. त्याला घडवावा लागतो. म्हणून कार्यकर्ता हा प्रशिक्षित असावा. आपले महापुरुष जसे अभ्यासू, समर्पित, ध्येयनिष्ठ, चरित्रसंपन्न, नीतिवान होते, तसेच कार्यकर्ता व नेता सुध्दा असावा. त्यांना उत्तम वकृत्वाचे धडे दिले पाहिजे. समाजात, राजकारणात निर्माण होणाऱ्या समस्या आणि प्रश्नावर मांडणी, विश्लेषण, सोडवणूक कशी करावी याचे प्रशिक्षण त्याला दिले पाहिजे. त्यामुळे जनतेला तो आदरणीय, अनुकरणीय व आदर्श राहून लोकांच्या विश्वासाला पात्र ठरेल. त्यांच्या बोलण्यात व कृतीत अंतर असू नये. जनता अशा नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या पाठीमागे ठामपणे व संघटीतपणे उभे राहतील. कार्यकर्ता असेल तर चळवळ, पक्ष जगेल. म्हणून असा निस्पृह कार्यकर्ता पक्षाने घडवावा असे वाटते.

क्रमशः

आर.के.जुमळे,

अकोला

 

 

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: