बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते ! भाग बाविसावा

14 Mar

बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते !

भाग बाविसावा

नेतृत्वाच्या बाबतीत एक इंग्रजी कवी म्हणतो की, ‘सोन्याला जंग लागला तर लोखंडाची बिकट अवस्था होईल. मेंढपाळाच्या अंगाला  चिखल लागला तर मेंढ्या पण अस्वच्छ राहतील.’ हेच तत्व नेत्याला पण लागू होतात. नेत्यात क्षमता, योग्यता, निष्टा, त्याग, समर्पण, इमानदारी, साहस, दूरदृष्टी, निस्वार्थीपणा, चिकाटी, सचोटी, प्रामाणिकपणा, प्रांजळपणा, निस्पृहता, सहनशीलता, हिंमत, धीर, मुत्सद्देगिरी, राजकीय डावपेचात तरबेज असणारा  इत्यादी गुण असले पाहिजेत. तो केवळ बुद्धिमान असून चालत नाही तर तो शीलवान असला पाहिजे. म्हणजेच चारित्रसंपन्न असला पाहिजे. म्हणूनच तथागत  बुद्धांनी प्रज्ञेसोबत शिलाची सांगड घातली होती. याबाबत साक्रेटीस म्हणतात ते खरेच आहे. ते म्हणतात, ‘विवेकशील आणि चारित्रसंपन्न व्यक्तीच्या नेतृत्वाशिवाय समाजाला वाचविणे आणि मजबूत करणे कसे शक्य आहे?’ म्हणून समाजाला वाचविण्यासाठी व मजबूत करण्यासाठी विवेकशील व चारित्रसंपन्न व्यक्तीच्या नेतृत्वाची गरज असते. बाबासाहेबांनी असे नेतृत्व दिले होते म्हणून समाजावर त्यांचा खोलवर परिणाम झाला होता.

नेत्याच्या बाबतीत एच.डी.आवळे (आवळेबाबू) यांनी छान वर्णन केले आहे. ते म्हणतात की, ‘समाजाला दोन प्रकारच्या नेत्याची गरज असते. पहिला समाजाची बौद्धिक गरज पूर्ण करणारा व दुसरा समाजात जावून संघटन तयार करणाऱ्या संघटकाचा. समाजाच्या ह्या दोन शक्ती आहेत. बुद्धिमान नेता हा ट्रेनच्या इंजिन सारखा तर संघटक नेता हा इंजिनला जोडलेल्या डब्ब्यासारखा असतो. इंजिनचे कार्य रस्ता दाखवून जोडलेल्या डब्ब्यात बसलेल्या प्रवाशांना घेऊन जाण्याचे असते. प्रवाशांना घेऊन योग्य त्या ठिकाणी पोहचवून उद्दिष्ट प्राप्त करण्याचे इंजिनचे कार्य असते. संघटक नेत्याशिवाय बुद्धिमान नेता हा हवेत फुगे उडविणारा तर बुद्धिमान नेत्याशिवाय संघटक नेता हा पर्वतावरील निर्जीव दगडासारखा पडून राहील.’

व्यक्तीपेक्षाही संघटनेला महत्व दिले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना व्यक्तीपूजा मान्य नव्हती. व्यक्ती आज आहे, उद्या नाही. पण संघटना मात्र आहे, त्याच ठिकाणी राहते. ती कायम राहते. व्यक्ती गेल्यानंतर संघटनेला बाधा यायला नको. म्हणून संघटना ही मजबूत असायला पाहिजे. आकाशात उडणाऱ्या एका  पक्षाकडे कुणाचे लक्ष जाणार नाही. पण घोळक्याने उडणाऱ्या पक्षांकडे लोकांचे मात्र नक्कीच लक्ष जाते. हीच संघटनेची खरी ओळख, ताकद असते. म्हणून चांगले नेते हे संघटनेला खरी ओळख व ताकद देतात. असे चांगले नेते घडविण्याची प्रक्रिया पक्षाने निर्माण केली पाहिजे असे वाटते.

क्रमशः

आर.के.जुमळे,

अकोला

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: