बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते ! भाग एकविसावा

14 Mar

बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते !

भाग एकविसावा

१२.  नेतृत्वाची शृंखला निर्माण करणे

बाबासाहेब म्हणतात, ‘राजकारण कोणास करावयाचे असेल, तर राजकारणाचा चांगला अभ्यास केला पाहिजे. अभ्यासाशिवाय जगामध्ये कोणालाच काही साधता येणार नाही. आपल्या समाजातील प्रत्येक कार्यकर्त्याने राजकीय, धार्मिक आणि आर्थिक प्रश्न या सर्व प्रश्नांचा बारकाईने अभ्यास करावयास पाहिजे. त्यांनी पुढाऱ्यांची जबाबदारी काय आहे, याची जाणीव ठेवावयास पाहिजे. कारण आपल्या समाजातील पुढाऱ्यावर अत्यंत मोठी जबाबदारी आहे. इतर पुढाऱ्याचे काय? सभेत जाणे, लांबलचक भाषण करणे, टाळ्या मिळविणे आणि शेवटी हार गळ्यात घालून परत येणे, एवढेच काम इतर पुढाऱ्यांचे असते. आपल्या समाजातील पुढाऱ्यांना हे करून भागत नाही. चांगला अभ्यास करणे, समाजाच्या उन्नतीसाठी स्वत: रात्रंदिवस सतत अंगमेहनत करणे हे आपल्या पुढाऱ्याला करावे लागेल; तरच तो लोकांचे थोडे फार भले करू शकेल आणि तोच पुढारी ठरू शकेल.’ (डॉ.बाबासाहेब आबेडकरांची भाषणे खंड ६ संपादक – मा.फ.गांजरे पृ.१९१) म्हणजेच नेत्यांना विचाराची पक्की बैठक आणि वास्तवाचे चिकित्सक ज्ञान असायला पाहिजे. नाहीतर कबीर म्हणतात तशी अवस्था होऊ शकते. ते म्हणतात,

‘जो का गुरु अंधा हो, वो का चेला अंधा हो !

अंधे को अंधा मिला, शाबूत बचा न कोय !!

मराठीमध्ये असेही म्हणता येईल की,

‘आंधळ्या गुरुचा शिष्यही आंधळा…

आंधळ्याच्या भेटी आंधळाही गेला…

सत्यानाश झाला दोघांचाही…!’

मा. कांशीरामजी नंतर बहीण मायावतीचे नेतृत्व उदयास आले. पण त्यानंतर कोण ? असा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून दुसऱ्या व तिसऱ्या फळीचे नेतृत्व राष्ट्रीय स्तरावर व राज्य स्तरावर निर्माण होण्याची प्रक्रिया सतत सुरु असली पाहिजे. म्हणजे नंतर कोण? याचे उत्तर शोधायची गरज निर्माण होणार नाही. पक्षाची सर्वोच्च नेता बहीण मायावती यांच्या नंतरचे पक्षाचे चेहरे लोकांना दिसले पाहिजेत. त्यांना संपूर्ण भारतभर दौरे काढून फिरविले पाहिजे. त्यामुळे त्यांची जनतेला ओळख होईल. त्याशिवाय त्यांच्यातील नेतृत्वगुण लोकांच्या लक्षात येवून आपला पक्ष मजबूत पायावर उभा आहे, असा विश्वास लोकांमध्ये निर्माण होण्यास मदत होईल.

एका राज्यातील नेते दुसऱ्या राज्यात गेल्यावर लोकांना त्यांचे कौतुक वाटते. एकदा मुंबईला मा. कांशीरामजीची सभा झाली होती; तेव्हा उत्तरप्रदेशातील पक्षाचे मंत्री स्टेजवर पाहून व त्यांचे भाषणे ऐकून लोक हरखून गेले होते. कांग्रेसचे, भाजपाचे दुसऱ्या-तिसऱ्या फळीचे नेते देशभर फिरून सतत लोकांच्या संपर्कात असतात. तीच प्रक्रिया पक्षाने अवलंबीली पाहिजे असे वाटते.

क्रमशः

आर.के.जुमळे,

अकोला

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: