बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते ! भाग विसावा

14 Mar

बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते !

भाग विसावा

११. बामसेफ, पी.बी.एस.पी.च्या धर्तीवर कामगार-अधिकारी वर्गाची संघटना निर्माण करणे

समाजातील अराजकीय मुळे पक्के करण्याकरीता मा. कांशीरामजींनी १९७८ साली कामगार-अधिकाऱ्यांची ‘बॅकवर्ड अँड मायनॉरिटी कम्युनिटी एम्प्लॉईज फेडरेशन’ (बामसेफ) नावाची संघटना स्थापन केली होती. मा. कांशीरामजी म्हणायचे की, ‘जिस समाजकी गैर राजनीतिक जडे मजबूत नही होती है, उस समाजकी राजनीती कामयाब नही होती!’

ही संघटना स्वतःच्या कल्याणासाठी न झटता केवळ समाजाचे हित जोपासणारी होती. या वर्गाला केवळ बाबासाहेबांच्या चळवळीचा लाभ घ्यावा एवढेच माहिती होते. परंतु त्यांचेवर समाजाची परतफेड करण्याची जबाबदारी आहे, ही दायित्वाची भावना पहिल्यांदा मा. कांशीरामजींनी त्यांच्यात जागविली. या माध्यमातून हा वर्ग बुद्धी, वेळ व पैसा द्यायला लागला होता. शिवाय पडद्याच्या आड राहून बी.एस.पी.या राजकीय पक्षाचे सुध्दा काम करीत होता. परंतु नंतरच्या काळात डी.के.खापर्डे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बाहेर पडून या संघटनेला रजिस्ट्रेशन केल्याने या संघटनेच्या नावाने काम करणे अवघड झाले होते. म्हणून मा. कांशीरामजी यांनी बामसेफ बरखास्त करून कामगार-अधिकाऱ्यांनी बी.एस.पी.चे थेट काम करावे असे सांगितले. पण नोकरीविषयक बंधने असल्याने त्यांना सरळ पक्षाचे काम करणे अवघड होत होते. तेव्हा मा. कांशीरामजी यांनी पे बॅक टू सोसायटी (पी.बी.एस.पी.) ची कल्पना मांडली. ही संघटना निर्माण झाल्यानंतर आम्ही या संघटनेत काम करायला लागलो. या संघटनेद्वारे आम्ही दर महिन्याला १५० रुपये जमा करीत होतो. त्यातून कॅडर कँप सारख्या स्थानिक कार्यक्रमासाठी ५० रुपये ठेऊन १०० रुपये मा. कांशीरामजी यांना देत होतो. त्यावेळी जवळपास एक लाखाची थैली मा. कांशीरामजी यांना दरमहा देत होतो. त्यानंतर याही संघटनेच्या विरोधात ओरड झाल्याने ही संघटना सुध्दा बरखास्त करण्यात आली. आता कामगार-अधिकारी वर्गाला पक्षाचे काम करण्यासाठी व त्यांना पक्षाशी जुळून ठेवण्यासाठी कोणतेही माध्यम उरले नाही. तरी पुन्हा अशा प्रकारची संघटना तयार व्हावी असे वाटते. म्हणजे कामगार-अधिकारी वर्गाला त्याद्वारे चळवळीचे काम करण्यासाठी योगदान देता येईल.

क्रमशः

आर.के.जुमळे,

अकोला

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: