बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते ! भाग एकोणीसावा

14 Mar

बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते !

भाग एकोणीसावा

१०. कामगार आघाडी निर्माण करणे

महाराष्ट्रात १९९१ साली त्यावेळचे पक्षाचे संयोजक मा.श्रीकृष्ण उबाळे यांनी बामसेफच्या काही ठळक सक्रीय कार्यकर्त्यांची नागपूर येथे तीन दिवस बैठक घेऊन काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले होते. त्यात माझाही सहभाग होता. या बैठकीत्त चर्चेअंती ‘बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन’ ही बी.एस.पी. संलग्नित कामगार संघटना निर्माण करण्यात आली होती. या संस्थापकीय कार्यकारणीत मला संयुक्त सचिव हे पद देण्यात आले होते. परंतु त्यानंतर काही लोकांनी या निर्णयाला विरोध करून मा. कांशीरामजी यांनाही तसे पटविण्यात आले. त्यामुळे या ना त्या कारणाने मा. कांशीरामजी यांनीच मा. श्रीकृष्ण उबाळे यांना पक्षापासून दूर करण्यात येऊन ‘बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन’ला सुध्दा झिडकारण्यात आले. तेव्हापासून हे अपत्य मा. श्रीकृष्ण उबाळे सांभाळीत होते.

खरं म्हणजे प्रत्येक पक्षाला स्वतःच्या कामगार संघटना आहेत. कॉग्रेसला इंटक, भाजपला बी.एम.एस. तर भाकपला आयटक संघटना संलग्नित आहेत. एवढेच नव्हे तर शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेने (मनसे) सारख्या प्रादेशिक पक्षाने सुध्दा आपल्या कामगार आघाड्या तयार केल्या आहेत. त्यामुळे त्यांचे कामगार सभासद हे पक्षाच्या विचाराचे वाहक असतात. आपल्या पक्षाचे विचार तो कामगार क्षेत्रात पेरत राहतो.

तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सुध्दा दि.१२ व १३ फेब्रूवारी १९३८ साली मनमाडच्या रेल्वे परिषदेत कामगार संघटनाची आवश्यकता प्रतीपादन केली होती. १९३० साली बाबासाहेब ‘बॉम्बे टेक्स्टाईल लेबर युनियन’चे उपाध्यक्ष व १९३४ पासून ते ‘म्युनिसिपल कामगार संघा’चे अध्यक्ष होते. तसेच त्यांचे विदर्भातील विश्वासू सहकारी एल.एन.हरदास यांनी १ जानेवारी १९३१ रोजी नागपूरला ‘मध्यप्रांत वऱ्हाडबिडी कामगार संघ’ स्थापन केला होता. बिडी कामगारांच्या हितासाठी बाबासाहेबाचे सहकारी आमदार रामचंद्र फुले व राघव घोडीचोर यांनी वऱ्हाडाच्या विधानसभेत विधेयक मांडले होते. अर्थातच यामागे बाबासाहेबांची प्रेरणा होती.

त्याचप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर ९ नोव्हेंबर १९४२ रोजी आकाशवाणी केंद्रावरून मजूरमंत्री या नात्याने केलेल्या भाषणात म्हणाले होते की, ‘देशाला अचूक नेतृत्व देण्याची गरज आहे. हे नेतृत्व कोण देऊ शकेल? हे नेतृत्व फक्त कामगारच देऊ शकेल असे मला वाटते. नवी समाजरचना कामगाराचे आशास्थान असते. त्यासाठी कामगारच योगदान करू शकतात आणि या दिशेने भारताचे राजकीय भवितव्य ते साकार करू शकतात.’ म्हणून बहुजन समाज पार्टीने  सुध्दा परत कामगार संघटने बाबत  विचार करावा असे वाटते.

क्रमशः

आर.के.जुमळे,

अकोला

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: