बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते ! प्रस्तावना

14 Mar

बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते !

प्रस्तावना

मी या विषयावर जुलै २०१३च्या दरम्यान प्रदीर्घ असा लेख लिहिला होता. हा लेख कोणतेही वर्तमानपत्र अथवा नियतकालिक छापणार नाही; याची मला पुरेपूर कल्पना होती. म्हणून मी हा लेख rkjumle.wordpress.com या साईटवर टाकला होता.

लोकसभेच्या निवडणुकीनंतर काही दिवसापूर्वी एकाने फेसबुकवर लिहिले होते की, बसपाची २०१२ साली उत्तरप्रदेशात सत्ता गेली व आता २०१४च्या लोकसभेत एकही खासदार निवडून आला नाही. राष्ट्रीय पक्ष असलेल्या बसपाची अशी स्थिती का झाली? याला कोण जबाबदार आहे? या बाबत आपले मत नोंदवावे. अशी ती पोष्ट होती. म्हणजे आंबेडकरी जनता या विषयाबाबत अतिशय संवेदनशील बनले असल्याचे हे द्योतक होते. खरेच आहे की, आंबेडकरी बाण्याचा लोकसभेतला आवाज पूर्णपणे दबल्या गेला होता, याची खंत आंबेडकरी जनतेला वाटणे साहजिकच होते.

त्यानंतर मला पण वाटायला लागले होते की, मी हा जो लेख लिहिला, तो दररोज फेसबुकवर टाकून निदान फेसबुकच्या वाचकापर्यंत तरी पोहोचवावे. म्हणून हा लेख मी फेसबुकवर ४७ भागात विभागून दि. ०८.०१.२०१५ ते २३.०२.२०१५ ह्या कालावधी दरम्यान टाकला होता.

मी या लेखात २०१२ साली उत्तरप्रदेशात आणि देशात बसपाची जी घसरण झाली, त्या संदर्भात विचार मांडले होते. त्यावेळी लोकसभेच्या निवडणुका व्हायच्या होत्या. मा. कांशीरामजी सोबत तन, मन, धन वाहून मिशनरी वृतीने बसपा आणि बामसेफ मध्ये काम करणाऱ्या पण नंतरच्या काळात या ना त्या कारणाने चळवळीपासून दूर गेलेल्या अशा कार्यकर्त्यांचे मनोगत संकलित करून मी या लेखात मांडण्याचा प्रयत्न केला होता.

मी हा जो लेख लिहिला, त्यात निव्वळ बसपा किंवा नेत्यावर टीका करण्याचा उद्देश नाही. तर बसपाचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी आत्मनिरीक्षण करून बसपाला उभारी द्यावी, असा माझा उद्देश होता.

आता ११ मार्च २०१७ ला उत्तरप्रदेश विधानसभेत बहुजन समाज पार्टीला केवळ २० जागा मिळाल्याचे अगदी अनपेक्षित आणि धक्कादायक निकाल पाहून परत हा लेख फेसबुक व व्हॉटसअॅपवर टाकावा असे मला वाटत आहे.

मित्रांनो मला माहिती आहे की, बसपाचे कार्यकर्ते, समर्थक, हितचिंतक हे भावनेवर वाहवत जाणारे नाहीत. तर ते मा.कांशीरामजी यांच्या शिकवणीनुसार इतिहासाचा मागोवा घेऊन समर्पक चिकित्सा, वास्तवता आणि तथ्य याचे विश्लेषण करून बुद्धिवादी व निखळ वैज्ञानिक दृष्टीने विचार करणारा वर्ग आहे. म्हणून माझ्या या लेखाकडे त्याच दृष्टीकोनातून पाहावे, अशी माझी अपेक्षा आहे.

उद्यापासून मी हा लेख क्रमशः टाकत आहे.

आर.के.जुमळे, अकोला

दि.१३.०३.२०१७

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: