बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते ! भाग अठरावा

14 Mar

बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते !

भाग अठरावा

८.   निवृत्त झालेल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांचा सहभाग घेणे

जे लोक नोकरीच्या काळात पक्षाचे पडद्याबाहेरील कार्यकर्ते किंवा हितचिंतक असतात, त्यांना निवृतीनंतर पक्षाच्या कामात सहभागी करून त्यांच्या बौद्धिक क्षमता व कौशल्याचा उपयोग करून घेण्यासाठी ठोस अशी यंत्रणा निर्माण करावी  असे वाटते. सेवानिवृत्त झालेले लोक आर्थिक व बौद्धिकदृष्ट्या संपन्न असू शकतात. नोकरीत असतांना तो कामात गुंतलेला असतो. पण नोकरी गेल्यावर वेळ कसा घालवावा असा प्रश्न बहुतेकांना पडतो. म्हणून ह्या रिकाम्या वेळेचा उपयोग ते पक्षासाठी देऊन पक्षाच्या लहान-मोठ्या कामात आपले मन गुंतवू शकतात.

असे म्हणतात की, नोकरीच्या काळात आर.एस.एस. मध्ये लपून-छपून काम करणारे कर्मचारी-अधिकारी सेवानिवृत्त झाल्यावर आर.एस.एस. व भाजपामध्ये थेट काम करीत असतात. ऐवढेच नव्हेतर आय.ए.एस., आय.पी.एस., आय.एफ.एस. सारख्या सनदी व सैन्यदल सारख्या इतर मोठमोठ्या सरकारी पदावर काम केलेल्या लोकांना भाजपाने पक्षामध्ये सामावून घेतले आहेत. त्यामुळे त्यांच्या बौद्धिक क्षमतेचा वापर भाजपा करीत आहे. तशीच एक नीती व ठोस धोरण बी.एस.पी.ने सुध्दा आखावी म्हणजे त्याद्वारे निवृत्त झालेले कर्मचारी-अधिकारी चळवळीकडे आकर्षित होवून पक्षात काम करण्यास त्यांना संधी मिळेल. त्यामुळे गप्पा-गोष्टी व इकडे-तिकडे फिरण्यात वाया जाणारा वेळ आणि  शक्ती चळवळीसाठी उपयोगात येईल असे वाटते.

९.  मिशनरी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करणे

खरे म्हणजे मिशनरी कार्यकर्ता हा संघटनेचा व पक्षाचा कणा असतो. त्याला कोणत्याही गोष्टीची अभिलाषा नसते. त्याला नाही पद पाहिजे ना प्रतिष्ठा, ना प्रसिद्धी ! फक्त निष्ठेने व सेवाभाव वृतीने काम करीत राहणे हेच त्याचे उद्दिष्ट्ये आणि मिशन असते. म्हणून पक्षात अशा मिशनरी वृतीने व निष्ठेने काम करणाऱ्या लहानसहान कार्यकर्त्यांचीही वेळोवेळी दखल घेऊन त्यांना सतत प्रोत्साहित करीत राहावे असे वाटते.

क्रमशः

आर.के.जुमळे,

अकोला

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: