बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते ! भाग सतरावा

14 Mar

बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते !

भाग सतरावा

शिक्षणातून बाहेर पडल्यावर युवकांना बेरोजागारीशी सामना करावा लागतो. शिक्षण घेता घेता नाकी नऊ आल्यावर आता रोजगार मिळविणे हे एक दिव्यच होवून बसते. अर्जाची फी, कागदपत्राच्या सत्य प्रती, पोस्टल ऑर्डर्स, अर्ज पाठविण्याचा खर्च, लेखी अथवा मौखिक परीक्षेला जाण्यायेण्याचा खर्च, मधल्या दलालाचा खर्च, भ्रष्टाचार अशा अनेक बाबीवर खर्च करून करून घाईस येतो.

मनुवादी शासकांना वाटत नाही की बहुजन समाज हा आत्मनिर्भर व्हावा म्हणून !  जर हा वर्ग आत्मनिर्भर झाला तर त्याचे लक्ष शासनसत्ता हस्तगत करण्याकडे जाईल. म्हणून त्याला सतत समस्यात गुंतवून ठेवण्यात बाध्य केल्या जात असते. म्हणून विदयार्थी-युवक वर्ग ह्या समस्यांच्या मुळात जावून संघर्ष करीत नाही, तोपर्यंत दुर्दशा त्यांची साथ सोडणार नाही. म्हणून या महत्वपूर्ण विषयावर विचार व संघर्ष करण्यासाठी विदयार्थी व युवकांच्या वेगळ्या शाखा असणे आवश्यक आहे. कारण बहुजन समाज बेरोजगारीच्या विस्तवात भाजून निघत आहेत.

राज्य लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा देतांना बहुजन विद्यार्थ्यांना वेगळ्याच समस्यांशी झुंजावे लागते. याकडे कोणत्याही राजकीय पक्षाचे लक्ष गेले नाही. या परीक्षेत विदयार्थी कसातरी मौखिक परीक्षेपर्यंत जावून पोहचतो. परंतु त्याला मौखिक परीक्षेत एकतर लेखी परीक्षेपेक्षा कमी मार्क्स मिळतात किंवा एकदम कमी मार्क्स देवून त्याला आयएएस, आयपीएस बनण्यापासून वंचित केल्या जाते

महिलांची सुध्दा वेगळी आघाडी उघडणे आवश्यक आहे. महिला ह्या समाजाचा अर्धा हिस्सा आहे. ती जर राजकीयदृष्ट्या जागृत असेल तर घरातील कुटुंबाना ती दिशानिर्देश देऊ शकते. पूर्वी अशी आघाडी होती. त्यांची अधिवेशने पण महाराष्ट्रात होत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर २०.०७.१९४२ रोजी नागपूरला म्हणाले होते की, ‘आमच्या चळवळीला तो पर्यंत सफलता मिळू शकत नाही, जो पर्यंत महिला सुध्दा पूर्णपणे सक्रीय होवून चळवळीला गती देण्यास मदत करीत नाहीत. स्वयंसेवी संघटना खेड्यापाड्यात, शहरात स्थापन व्हावेत. नवयुवक व विद्यार्थ्यांनी आपल्या समाजाची सेवा करण्याचे भाव आपल्या मनात जागवावे. समाजाचा मोठा भार त्यांनाच उचलायचा आहे. ही गोष्ट त्यांनी कधीही विसरू नये.’

क्रमशः

आर.के.जुमळे,

अकोला

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: