बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते ! भाग सोळावा

14 Mar

बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते !

भाग सोळावा

७. युवक, महिला, विद्यार्थी, कामगार अशा निरनिराळ्या शाखा स्थापन करणे

पूर्वी बामसेफ संघटनेच्या जडणघडणीत विद्यार्थी, युवक, महिला, औद्योगिक कामगार, शेतकरी-शेतमजूर अशा विविध शाखेचा अंतर्भाव होता.

प्रत्येक पक्षाने युवक, महिला, विद्यार्थी, कामगार, वकील, डॉक्टर्स असे विविध आघाड्या स्थापन केल्या आहेत. तसेच बी.एस.पी.ने सुध्दा करावेत असे वाटते. त्यामुळे त्या त्या क्षेत्रातील लोकांना मोठ्या प्रमाणात काम करण्यास वाव उपलब्ध होतो. त्यामुळे पक्षातील सहभाग वाढत जातो.

विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक पक्षाने स्वतंत्र शाखा उघडली आहे. भाजपाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कम्युनिस्टांनी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन, कॉंग्रेसने नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया अशा शाखा उघडल्या आहेत. आज १८ वर्षावरील तरुण-तरुणींना मतदानाचा हक्क मिळाला आहे. हा वर्ग समाजात व समाजाच्या बाहेर विद्यार्थी जगतात वावरत असतो. हा वर्ग लवकरच परिवर्तन चळवळीकडे आकर्षित होत असतो. तो जर वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ केले तर तो आपल्या मताचे प्रचारक व वाहक ठरू शकतात. म्हणून त्यांची वेगळी आघाडी स्थापन करून त्यांना स्वतंत्रपणे काम करण्यास वाव मिळवून द्यावा असे वाटते. म्हणून त्याचे राजकीयदृष्ट्या प्रबोधन होणे आवश्यक आहे. कारण हा वर्ग विदयार्थी जीवनापासूनच राजकारणाचे धडे घेत असतो. देशात प्रत्येक महाविद्यालयात विदयार्थी प्रतिनिधीसाठी निवडणुका होत असतात. प्रत्येक राजकीय पक्षाचे पॅनल उभे असतात. येथूनच त्यांना राजकीय विचारधारेचे आकलन होते आणि पुढे त्यांच्यापैकी काहीजण सक्रियपणे त्या पक्षाच्या राजकारणात भाग घेतात. त्यांच्यातील नेतृत्वगुण विकसित होण्यास येथूनच सुरुवात होते. शिवाय बहुजन विद्यार्थ्यांचे विद्यार्थी जीवनात बऱ्याच समस्या असतात. अॅडमिशनच्या समस्या, फी आकारणी, क्रमिक पुस्तकांच्या वाढलेल्या किंमती, महागाईशी निगडीत स्कॉलरशिप न मिळणे, स्कॉलरशिप वेळेवर न मिळणे, शहरात राहण्याची समस्या, शिक्षणाचे बाजारीकरण, आठव्या वर्गापर्यंत परीक्षा पद्धती बंद झाल्याने बहुजन विदयार्थी शिक्षणात मागे पडणे, परीक्षेत लेखी परीक्षा पेक्षा मौखिक परीक्षेत कमी मार्क्स पडणे, शिकवणी वर्गाचा सुळसुळाट अशा अनेक समस्या विद्यार्थ्यांना भेडसावीत असतात. बहुजनातील गरीब विदयार्थी सरकारी शाळेत शिकतो, जेथे कोणत्याही सुविधा नसतात. उच्चवर्णीयांचे मुले इंग्रजी माध्यमातील खाजगी शाळेत शिकतात, जेथे साऱ्याच सुविधा असतात. त्यामुळे हे मुले पुढे जातात तर गरीब विदयार्थी मागे पडतात. निराश होवून शाळा सोडून देतात. मग उच्चवर्णीयांची स्वस्तात सेवा चाकरी करायला ‘स्वस्त मजूर’ म्हणून यांचा वापर होतो.

महागडे शिक्षण करून गरीब मुलांनी शिक्षण घेऊ नये अशी व्यवस्था मनुवादी शासक करीत आहेत, जेणेकरून हा बहुजन समाज वर्षोनुवर्षे दारिद्र्यात खितपत पडून अज्ञानतेच्या चिखलात व धर्मांधतेच्या कर्मकांडात फसून राहावे असे त्यांना वाटत असते. म्हणून या समस्या समजून त्या विरुध्द लढणारा विदयार्थी वर्ग तयार व्हायला पाहिजे नाहीतर शिक्षणाच्या संधी पासून बहुजन समाज दुरावल्या जाईल.

क्रमशः

आर.के.जुमळे,

अकोला

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: