बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते ! भाग पंधरावा

14 Mar

बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते !

भाग पंधरावा

हे खरे आहे की, सर्वसामान्यरित्या बौद्धांनी सुध्दा सुरुवातीच्या काळात बी.एस.पी.ला नाकारले होते. कारण बी.एस.पी.जरी बाबासाहेबांचे विचार घेऊन जात असले तरी हा पक्ष बाबासाहेबांचा नाही. आर.पी.आय.च बाबासाहेबांचा पक्ष आहे अशी भावनिक भूमिका महाराष्ट्रातील सर्वसामान्य बौध्दांची झाली  होती. हे लोक जरी आठवले, गवई, कवाडे, प्रकाश आंबेडकर यांना शिव्या देत होते, तरी निवडणूक आली की त्यांच्या नारळाचे झाड, रेल्वे इंजिन, उगवता सूर्य कप-बशी अशा त्यांच्या उमेदवाराच्या चिन्हावर ठप्पा मारीत. पण मतपत्रिकेत त्यांच्या पुढ्यात दिसणाऱ्या पूर्वीच्या बाबासाहेबांच्या व आताच्या बी.एस.पी.च्या हत्ती या चिन्हावर मात्र ठप्पा मारीत नव्हते. हीही एक गंमत त्यावेळी पाहायला मिळत होती. मुळात ज्या पक्षाचे (आर.पी.आय.) चे ऐक्य टिकून राहत नाही. तो पक्ष बाबासाहेबांचा कसा? असा प्रश्न विचारला तर आर.पी.आय. हितचिंतकांच्या नाकाला मोठ्या मिरच्या झोंबत ! परंतु जो पक्ष (बी.एस.पी.) बाबासाहेबांचा विचार घेऊन देशात झंझावात निर्माण करतो, तोच खऱ्या अर्थाने बाबासाहेबाचा पक्ष ठरतो, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. महाराष्ट्रात बौध्द तर नाहीच पण इतर कोणतीही जात ही बी.एस.पी.चा बेस बनला नव्हता. ही गोष्ट नाकारता येणार नाही.

सध्याच्या काळात बौध्द सोडले तर इतर समाजाचे लोक पक्षात बोटावर मोजण्याएवढेच दिसत आहेत. आर.पी.आय.चे निरनिराळे गट व बी.एस.पी. या सर्वांचे हा समाज म्हणजे भांडवल झाला आहे. त्याच तुटपुंज्या संख्येत असलेल्या बौध्दाची इकडे-तिकडे पळवापळवी होत असल्याचे चित्र आपल्याला दिसत आहे. त्यामुळे कुणालाच जनाधार उरलेला दिसत नाही.

तेव्हा परत मुस्लीम, आदिवासी, भटके व ओबीसींचा सहभाग पक्षात वाढविण्यासाठी खास प्रयत्न करण्यात यावेत. हा सारा वर्ग समदु:खी आहे. मनुवादी विषम समाजव्यवस्थेचे बळी आहे. कोणी कमी आहे, कोणी जास्त आहे, फरक एवढाच ! त्यामुळे त्यांना एका संघटनेच्या छायाछ्त्रात एकत्र व्हायला काही अडचण असेल असे वाटत नाही. परंतु त्यासाठी प्रत्येक जातीतील नेतृत्व आणि कार्यकर्ते निर्माण करावे लागेल. त्यांच्यासाठी प्रशिक्षण केंद्रे चालवावे लागतील. त्यांच्यासाठी सतत मेळावे, कॅडर कँप, मिटींग, कॉर्नर मिटींग  आयोजित करावे लागतील. पक्षाचे ध्येयधोरणे त्या त्या जातीतील लोकांनी त्या त्या जातीतील लोकांना सांगितल्यावर पटते, हे नक्की !  इतर जातीच्या लोकांचे म्हणणे सहसा कोणी ऐकत नाहीत किंवा पटवून घेत नाहीत. म्हणजेच सोनारानेच कान टोचावे अशी जी म्हण आहे, ती येथे लागू पडते. म्हणून पक्षाच्या कार्यकारणीत त्यांना महत्वाच्या पदावर प्रतिनिधित्व देण्यात यावेत असे वाटते.

मा. कांशीरामजी यांनी प्रकाशित केलेल्या ‘बामसेफ-एक परिचय’ या पुस्तिकेत उल्लेख केला आहे की, बामसेफचे तीन अनिवार्य तत्व आहेत. ते म्हणजे पहिले बहुजन आधारित म्हणजे मासबेस्ड, दुसरे व्यापक म्हणजे ब्रॉडबेस्ड, तिसरे म्हणजे कॅडरवर आधारित कॅडरबेस्ड. बी.एस.पी.चा पाया बामसेफने रचला आहे. त्यामुळे हे तीनही तत्वे बी.एस.पी.चे सुध्दा अंगभूत तत्वे आहेत हे ओघानेच आले.

क्रमशः

आर.के.जुमळे,

अकोला

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: