बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते ! भाग चवदावा

14 Mar

बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते !

भाग चवदावा

६. मुस्लीम, आदिवासी, भटके  व ओबीसींना पदावर घेणे

सद्याच्या परिस्तीतीत महाराष्ट्रात बहुजन समाजातील बौध्द वर्ग सोडला तर इतर वर्ग अपवादानेच बी.एस.पी.त दिसत आहेत. बाबासाहेब या बाबतीत म्हणाले होते की, ‘अनुसूचित जाती व मागासवर्ग (ओ.बी.सी.) यांच्यात एकता स्थापन व्हावी. पण दु:खाची बाब ही की दोन्ही वर्गाचे हित सारखे असून एकत्र येत नाही. कां तर मागासवर्ग अनुसूचित जाती सोबत राहू इच्छित नाही. त्यामुळे आमचा दर्जा घसरून अनुसूचित जातीच्या बरोबरीचे होऊ असे त्यांना वाटते.’

आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. फुले-शाहू-आंबेडकरांच्या चळवळीच्या रेट्यामुळे मागासवर्गही परिवर्तनाकडे झुकत चाललेला आहे. भटक्या-विमुक्त जातीच्या ४२ जातींनी  लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वात बुध्द धम्माची दीक्षा घेतली आहे. हनुमंत उपरे यांच्या निधनानंतर त्यांच्या संतोष, संदीप  पुत्राच्या नेतृत्वात हजारो ओ.बी.सी. जातींनी  २५ डिसेंबर २०१६ रोजी  बुध्द धम्माची दीक्षा घेतली. त्यांनी ‘बुद्ध धम्माच्या वाटेवर’ असे एक अभियान राबविले. ठिकठीकाणी परिषदा घेऊन ओ.बी.सी.वर्गांना जागृत केले. ही साऱ्या  प्रक्रिया वैचारिक परिवर्तनाचे द्योतक आहे. प्रकाश आंबेडकरांच्या भारिप-बहुजन महासंघाच्या अकोला पॅटर्नच्या प्रयोगात सुध्दा हा बदल दिसून आलेला आहे.

तरीही महाराष्ट्रात मुस्लीम, आदिवासी, भटके व ओबीसींचा सहभाग नसल्यासारखाच दिसत आहे. पूर्वी मा. श्रीकृष्ण उबाळे महाराष्ट्राचे संयोजक व अध्यक्ष असतांना निरनिराळ्या जातीचे नेते/कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात पक्षात होते व काही नव्याने पण आले होते. जसे कुणबी समाजाचे प्रा. मा.म.देशमुख, बाळासाहेब गावंडे, ब्रिगेडियर सुधीर सावंत, गोविंदराव ब्राम्हणकर, नागनाथ नायकवडी, बाबुराव गुरव, भारत पाटणकर, तेली समाजाचे किशोर जंगले, पांडुरंग ढोले, आदिवासी समाजाचे दशरथ मडावी, पुष्पाताई आत्राम, आगरी समाजाचे राजाराम साळवी, धनगर समाजाचे महादेवराव जानकर, दीपक यंबडवार, माळी समाजाचे वसंत नन्नावरे, अशोक गोरे, कोष्टी समाजाचे राम हेडाऊ, पांडुरंग हिवरकर, बौध्द समाजाचे राहुल हुमने, डॉ.भाऊ लोखंडे, डॉ. जमनादास खोब्रागडे, अशोक सरस्वती, राजरतन मोटघरे, रामप्रभू सोनोने, वामन निंबाळकर, लीलाताई कांबळे, सी.के.मानकीकर मातंग समाजाचे आर.के.त्रिभुवन, नंदाताई तायवाडे, एकनाथ आव्हाड, भटक्या समाजाचे लक्ष्मण गायकवाड, मुस्लीम समाजाच्या जैबुनिसा  शेख यांच्या शिवाय आणखी बरेच लोक होते. सर्वांचा उल्लेख करणे शक्य नाही. हे खरे आहे की, या लोकांचा समाज मात्र बी.एस.पी.मध्ये त्यावेळी आला नव्हता. पण हा त्यावेळेसचा माहोल जर टिकला असता तर उत्तरप्रदेशानंतर महाराष्ट्रात बी.एस.पी.ची सत्ता यायला वेळ लागला नसती. पण नव्याने सामिल झालेले लोक  आले कसे व नंतरच्या काळात गेले कसे ते कळलेच नाही.

 

क्रमशः

आर.के.जुमळे,

अकोला

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: