बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते ! भाग तेरावा

14 Mar

बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते !

भाग तेरावा

अलीकडे सत्ताधारी व विरोधी पक्ष निवडणुका जवळ आल्या किंवा निवडणुकांच्या जाहीरनाम्यात लोकांना खुष करण्यासाठी निरनिराळे हातखंडे अवलंबित असतात. त्यात लोकांना टी.व्ही.,लॅपटॉप, शिलाई मशीन, सायकल अशा गृहपयोगी वस्तू देणे, स्वस्त दरात धान्य देणे, कोणत्यातरी  योजनेच्या नावाने तुटपुंजे पैसे देणे,  अख्खे कुटुंब दाटीवाटीने राहतील व ज्यात कौटुंबिक प्रायव्हसी राहणार नाही असे लहान लहान घरे बांधून देणे, कर्जावर अनुदान देणे इत्यादी प्रकारची घोषणाबाजी करीत असतात. निवडून आल्यावर एकतर या घोषणांची अंमलबजावणी करीत नाहीत किंवा दुसरी निवडणूक जवळ येण्याच्या अगोदर करतात. हे राजकारण गरीब व अज्ञानी लोकांना कळत नाही. हा वर्ग यांच्या राजकारणाला बळी पडतो. मग हा वर्ग लाचार आणि मिंधा बनतो. तो या पक्षांचे गुणगान करून त्यानांच आलटून पालटून भरघोस मते देऊन निवडून आणतात. परंतु लोकांचे जीवनमान उंचावण्यास, जीवन जगण्यास आवश्यक असणारी किमान मजुरी किंवा  पगार मिळण्यासाठी त्यांना तसा रोजगार  त्यांच्या पात्रतेनुसार पुरविण्याची कोणतीही योजना हे सत्ताधारी वर्ग राबवीत नाहीत; जेणेकरून ह्या वस्तू किंवा  सुविधा तेच स्वत: विकत घेण्या इतपत त्यांची क्रयशक्ती वाढेल. म्हणजे त्यांच्या स्वाभिमानाला डीवचण्याची कोणीही हिंमत करणार नाही. म्हणून मनुवाद्याचे असले फसवे राजकारण लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी खेड्यापाड्यात व शहराच्या मोहल्या मोहल्यात लोकांचे राजकीय प्रबोधन होणे  अतीमहत्वाचे आहे.

एकदा आम्हाला असा अनुभव आला होता की,  प्रचाराच्या दरम्यान  त्या गावातील लोक हत्तीला मतदान करतील असा विश्वास निर्माण झाला होता. परंतु मतदानानंतर असे कळले की, त्यांनी हत्तीला मतदान न करता नारळाच्या झाडाचे चिन्ह असणाऱ्या आर.पी.आय.च्या एका गटाला मतदान केले. कारण हत्ती हे कांशीराम-मायावतीचे चिन्ह असून ते  दोघेही चांभार आहेत. ते  बाबासाहेबांच्या रक्ताचे नाहीत. अशा विरोधी प्रचाराचे निरसन करायला आम्ही परत त्या गावात गेलो नव्हतो, ही आमची चूक झाली होती.

निवडणुकीच्या काळात प्रचाराचा धुरळा उडविण्यापेक्षा शेतकरी जसा जमिनीची मशागत करतो. पावसाळा आल्यावर पेरणी करतो. मग चांगले रोपटे उगवून चांगले पिक हातात येते. तसेच पक्षाने वर्षभर पक्षाचा प्रचार-प्रसार व लोकांचे प्रबोधन करावे, व्यक्ती विकासासाठी शिबिरे आयोजित करावेत  म्हणजे निवडणुकीच्या काळात भरघोस मते पदरात पडल्याशिवाय राहणार  नाही.

म्हणून मध्येमध्ये खेड्यापाड्यात सतत कॅडर कँप आयोजित करून लोकांमध्ये पक्षाची विचारधारा सारखी रुजवत ठेवायला पाहिजे. त्यातूनच प्रशिक्षित कार्यकर्ते तयार होतील. त्यामुळे जागृतीचा दिवा विझणार नाही. पक्षाला जबरदस्त कॅडर बेस संघटनेचा आधार मिळेल. त्याचा फायदा कमिटेड वोटर्स निर्माण करण्यात होईल. निवडणुकीच्या काळात देशात कोणतीही हवा जरी आली तरी हे समर्पित मतदार (कमिटेड वोटर्स) वाहवत जाणार नाहीत. म्हणजेच न विकणारा समाज निर्माण होईल. तसेच काळाच्या ओघात  नेतृत्वात जरी बदल झाला तरी संघटन व विचारधारा मात्र कोणत्याही परिस्थितीत बदलू शकणार  नाही.

क्रमशः

आर.के.जुमळे,

अकोला

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: