बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते ! भाग बारावा

14 Mar

बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते !

भाग बारावा

४.  महाराष्ट्रात योग्य नेतृत्वाकडे पक्षाची कमान सोपविणे

राज्यातील बहुसंख्य लोकांना पक्षाचा अध्यक्ष कोण आहे, ही  माहिती असली पाहिजे. त्यासाठी तो सतत प्रकाशझोतात वावरत असला पाहिजे. त्यांचे वक्तृत्व, लढाऊपणा, बौद्धिक क्षमता व संघटन कौशल्य लोकांच्या लक्षात आली पाहिजे. त्यांनी लोकांची, कार्यकर्त्यांची मने जिंकली पाहिजेत. म्हणून जनमानसावर प्रभाव टाकू शकणाऱ्या नेतृत्वावर महाराष्ट्राच्या पक्षाची कमान सोपवली पाहिजे असे वाटते.

आपणास माहितच आहे की, भाजपचा अध्यक्ष नियोजित काळानंतर निश्चितपणे बदलविला जात असते. त्यामुळे त्यांच्या पक्षात नवीन नेतृत्व पुढे येवून योग्य अशा नेत्यांना संधी मिळत असते. यामुळे फायदा असा होतो की, त्यांच्या पक्षात नेत्यांची फळी सतत निर्माण होण्याची प्रक्रिया सुरु राहते. म्हणून बी.एस.पी.ने सुध्दा हा प्रयोग करण्यास काही हरकत नसावी असे मला वाटते. त्यामुळे वर्षोनुवर्षे तोच तो अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी न राहता नवीन नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळण्यास वाव मिळेल.

५. लोकांचे राजकीय प्रबोधन करणे

मी एकदा लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात मध्यप्रदेशात जांजगीर येथे नातेवाईकाकडे गेलो होतो. तेव्हा शेजारी त्यांच्या मित्राने चहासाठी बोलाविले होते. मी त्यांना विचारले की, येथे कुणाचा जोर आहे ? तेव्हा त्यांनी सांगितले की, पहिल्या क्रमांकावर भाजप आहे, दुसऱ्या क्रमांकावर कॉग्रेस आहे; तर तिसऱ्या क्रमांकावर बी.एस.पी. आहे. मग तुम्ही मत कुणाला देणार? असे मी विचारले असतांना त्यांनी बी.एस.पी.ला देणार असे सांगितले. मी त्यांना आमच्या महाराष्ट्रात ज्याचा जोर असेल त्यांना मत द्यावे. ज्याचा नसेल त्यांना  मत देऊन वाया घालवू नये अशी विचारसरणी आहे. त्यांनी सांगितले की, येथे तसे नाही. आज जरी बी.एस.पी. तिसऱ्या क्रमांकावर असली तरी उद्या ती दुसऱ्या व नंतर पहिल्या क्रमांकावर निश्चितच येऊ शकते. त्यामुळे आमचे मत वाया जात नाही तर आम्ही त्याची शक्ती वाढवतो. अर्थात त्याकाळी मध्यप्रदेशातील लोकांचे राजकीय प्रबोधन झाले होते. त्यामुळे ते उत्तरप्रदेश नंतर सत्तेच्या जवळजवळ चालले होते. असेच प्रबोधन महाराष्ट्रात व सगळीकडे  व्हावे असे वाटते.

महाराष्ट्रात काही लोक मते विकत असतात. प्रचाराच्या दरम्यान आम्हाला असा अनुभव आला की, लोक आता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना सुध्दा विकायला लागले आहेत. ‘पुतळा किंवा बुध्दविहार बनविण्यासाठी भाजप, कॉग्रेस आम्हाला ऐवढे पैसे देत आहेत. तुम्ही किती देणार ते सांगा? म्हणजे तुम्हाला आमच्या गावातील लोक मते देतील.’ असे सांगणारे गावातील काही लोक स्वतःला पुढारी समजणारे भेटले होते. एका ठिकाणी दारू प्यायला पैसे मागत होते. त्यांनी सांगितले होते की, ‘भाजप, कॉग्रेसने आम्हाला दारू पिण्यासाठी इतके पैसे दिले आहेत. तुम्ही त्यापेक्षा जास्त द्याल तर आम्ही तुम्हालाच मते देऊ.’ गावात प्रचाराची गाडी गेली की, भोवताल लोक जमा होतात. ते म्हणतात ‘माझ्या घरात इतके मते आहेत. तुम्ही मला ऐवढे पैसे द्या आम्ही तुम्हालाच मते देऊ.’ याचा अर्थ जसे कॉग्रेस-भाजपशी युती करणारे व त्यांच्याकडून पैसे घेऊन समाजाला विकणारे नेते हे मोठे दलाल आहेत तर घरातील लोकांना विकणारे हे छोटे दलाल आहेत.

तसेच समाजातील पाटील, सरपंच, तलाठी, शिक्षक, ग्रामसेवक यांचा मतदारावर फार मोठा प्रभाव असतो. ते गावातील लोकांच्या सतत संपर्कात असतात, लोकांची  कामे करीत असतात. म्हणून लोक त्यांच्या मागे असतात. ते सांगतील तसे लोक ऐकत असतात. त्यामुळे  त्याच्याकडे गावातील लोकांचा गठ्ठा मतदान असते. परंतु सत्तेत असणारे कॉग्रेस-भाजप त्यांची कामे करीत असल्याने ते त्यांचे बांधील व लाचार असतात, असाही प्रकार काही गावात आढळला आहे. त्यामुळे अशा लोकांशी सतत संपर्कात असणे, त्यांची कामे करणे आवश्यक आहे.

क्रमशः

आर.के.जुमळे,

अकोला

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: