बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते ! भाग अकरावा

14 Mar

बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते !

भाग अकरावा

३. जुन्या-जाणत्या कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात सामावून घेणे

बाबासाहेबांच्या हयातीत आणि त्यानंतर मा.कांशीरामजींच्या काळात सुध्दा महाराष्ट्रात विदर्भ अग्रेसर होता. विदर्भातून जरी आमदार, खासदार निवडून आलेले नसले, तरी बऱ्याच ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये प्रतिनिधी निवडून येण्यास सुरुवात झालेली होती. कधी नव्हे पण २००४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचा उमेदवार निवडून आला नाही, पण एकट्या विदर्भात १० टक्के मतदान घेऊन कॉग्रेस-राष्ट्रवादीचे ११ ही उमेदवार पाडलेत. म्हणजे पाडण्याच्या दुसऱ्या पायरीवर मजल मारून जिंकण्याच्या तिसऱ्या पायरीवर पाय ठेवण्याची सिद्धता पक्षाने केली होती, असेच म्हणावे लागेल. पक्षाच्या या घौडदौडीने  महाराष्ट्रातील  कॉग्रेस-राष्ट्रवादीला चागलीच धडकी भरली होती.

परंतु त्याच विदर्भातील अग्रगण्य कार्यकर्त्यांना पूर्वी आणि नंतर पक्षातून काढून टाकल्याने किंवा काहीजण निष्क्रीय झाल्याने पक्षाला त्याची किंमत अद्यापही मोजावी लागत आहे. तरी जे कार्यकर्ते पक्षात परत येऊ इच्छितात, त्यांना एकदा तरी संधी देऊन पक्षात सन्मानाने प्रवेश द्यावा. जसे भाजपने काढून टाकलेल्या कल्याणसिंह, उमा भारती आणखी काही लोकांना परत सामावून घेतले, असेच लवचिक धोरण पक्षाने स्वीकारावे असे वाटते. ज्यांनी ज्यांनी अथक परिश्रम घेऊन बी.एस.पी. वाढविली, फुलवली त्यांना परत सन्मानाने पक्षात घेण्यासाठी प्रयत्न करायला काही हरकत नसावी असे वाटते. राज्याराज्यातील ज्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना या ना त्या कारणाने काढून टाकण्यात आले, त्यांना दुराग्रह, वैमनस्य व हेवेदावे दूर करून पक्षात येण्यासाठी संधी देऊन पाहावी. त्यामुळे पक्षाच्या वाढीला फायदाच होईल.

बाबासाहेबांच्या काळात अशा गोष्टी घडल्या नाहीत असे नाही. पी.एन.राजभोज यांनी १९३२ च्या कामठी येथील परिषदेत विरोध केला होता. तरीही त्यांना क्षमा करून बाबासाहेबांनी त्यांच्याकडे १९४२ पासून शेड्युल्ड कास्ट फेडेरेशनचे कार्यवाह पद सोपविले होते. बाबासाहेबांना विरोध करणाऱ्या रावसाहेब ठवरे यांनाही आपल्यात सामावून घेतले होते. अशा तऱ्हेने चुका करणाऱ्या नेत्यांना ते सुधारण्याची संधी देत होते.

मतभेद कुठे नाही. घराघरात आहे. हे तर संघटन आहे. अनेक विचाराचे, प्रवृतीचे लोक असतात. तसेच चुका ह्या होतच असतात. माणूस म्हटला की चुका होणारच. पण त्यासाठी नैसर्गिक न्यायाचे तत्त्व अवलंबीले पाहिजे असे कोणीही म्हणेल. भारतीय संविधानाने आखून दिलेल्या न्यायाच्या प्रक्रीयानुसार न्यायनिवाडा व्हायला पाहिजे. गुन्ह्याचे स्वरूप गंभीर नसल्यास काही कालावधीसाठी निलंबित करून परत प्रवेशासाठी संधी देणे योग्य होईल. परंतु कोणतीही न्यायप्रक्रिया न अवलंबीता केवळ पूर्वग्रह व द्वेषापोटी तडकाफडकी काढून टाकणे हे न्यायोचित होऊच शकत नाही असे वाटते.

क्रमशः

आर.के.जुमळे,

अकोला

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: