बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते ! भाग दहावा

14 Mar

बहुजन समाज पार्टी बद्दल मला काय वाटते !  

भाग दहावा

तसेच ब्राम्हण वर्गातील गरिबांना आर्थिक आधारावर आरक्षण देणे हे तत्व जर सर्वमान्य केले; तर भारतीय संविधानातील सामाजिक व शैक्षणिक आधार कमजोर होवून बाबासाहेबांनी आखून दिलेली घटनेची चौकट खिळखिळी झाल्याशिवाय राहणार नाही. हा भविष्यकाळातील धोका पक्षाने लक्षात घ्यायला पाहिजे असे वाटते.

सामाजिक व शैक्षणिक आधारावर आरक्षण का देण्यात येते, या मागील कारणमीमांसा समजून घेणे आवश्यक आहे. एखादा ब्राम्हण आर्थिकदृष्ट्या गरीब असला तरी तो सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास ठरत नाही. त्याउलट एखादा दलित व्यक्ती  आर्थिकदृष्टया श्रीमंत असला तरी तो सामाजिक व शैक्षणिकदृष्टया पुढारलेला समजण्यात येत नाही. भारतात अशी परिस्थिती आणण्यास ब्राम्हणवादी व्यवस्थाच  कारणीभूत आहे. ही गोष्ट कशी विसरता येईल ?

मागासांना या ब्राम्हणवादी व्यवस्थेने सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय अशा अनेक आघाड्यावर मानवी हक्क नाकारले होते. अशा हजारो वर्षे वंचित, पिडीत वर्गाला नोकरी, शिक्षण, व्यवसायात संधी प्राप्त करून द्यावी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास हा निकष लाऊन आरक्षण देण्याची संविधानात तरतूद केली. म्हणून केवळ आर्थिकदृष्टया दुर्बल म्हणून खुल्या प्रवर्गातील घटकांना आरक्षण देणे समर्थनीय ठरत नाही. ही बाब पक्षाच्या नेतृत्वाने लक्षात घ्यावी असे वाटते.

म्हणून जनमानसावर प्रभाव पाडणारे आणि बहुजनांचे हित जोपासणारे धोरणे आखण्याकरीता पक्षाचे धोरण अथवा सुकाणू समिती असावी असे वाटते.

राजकारणात काही तडजोडी कराव्या लागतात. परंतु ह्या तडजोडी ध्येय, धोरण व तत्वाच्या विरोधात असू नये असे वाटते.

तसेच पक्ष चालवितांना काही चुका होणे शक्य आहे. ही गोष्ट बाबासाहेबांनी सुध्दा मान्य केली होती. ते म्हणाले होते की, ‘सार्वजनिक जीवनात भूलचूक होत असते. त्यामुळे आपण दु:खी होऊ नये. तर त्यातून आपल्या कमजोरीची ओळख करून त्याचे परिमार्जन करायला पाहिजे.’ म्हणून भविष्यात चुका होऊ नये म्हणून अशा समितीची मदत होईल असे वाटते.

क्रमशः

आर.के.जुमळे,

अकोला

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: