बुध्द विहार निर्मिती व समाज प्रबोधन

20 Nov

Visit buddha vihar blog
Buddha Vihar
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रम्हदेशच्या बुध्दिस्ट शासन कौन्सिल समोर १९५४ साली भाषण करतांना म्हणाले होते की, “विहारात दर रविवारी सामुदायिक बौध्द वंदना व त्यानंतर बौध्द धर्मोपदेश देण्याची प्रथा पाडावी.”
तसेच २४ नोव्हेंबर १९५६ ला सारनाथला ते म्हणाले होते की, “ प्रत्येक बौध्दाने आद्यकर्तव्य समजून दर रविवारी बुध्द विहारात जावे व तिथे उपदेश ग्रहण करावा. तसेच प्रत्येक गावांमध्ये बुध्द विहार निर्माण करुन त्यात सभा घेण्यासाठी सभागृह बांधावे.”
डॉ. बाबासाहेबांच्या या आदेशाप्रमाणे बौध्द समाजाने खेड्या-पाड्यात व शहराच्या मोहल्या-मोहल्यात लहानमोठे बुध्द विहार बांधण्याचा प्रयत्‍न केला. काही ठिकानी बांधून पूर्ण झाले तर काही ठिकानी ते अपूर्णावस्थेत पडून आहेत. काही ठिकानी सामाजिक सभागृहाचा वापर बुध्द विहार म्हणून केला जात आहे.
परंतू “बुध्द विहारामध्ये दर रविवारी प्रत्येक बौध्दाने आद्यकर्तव्य समजून जावे व तिथे उपदेश ग्रहण करावा.” या आदेशाप्रमाणे डॉ. बाबासाहेबांना पुजनीय मानणार्‍या बौध्द समाजाने दुर्लक्ष केले असे चित्र बर्‍याच ठिकानी दिसून येत आहे. ज्या ठिकानी बुध्द विहार आहेत त्या ठिकानी काही अपवाद सोडला तर केवळ पुजा प्रार्थना केली जाते. ती सुध्दा पोर्णिमा,जयंती, धम्म चक्र प्रवर्तन किवा महापरिनिर्वान दिन अशा प्रासंगिक वेळीच केली जात आहे असे दिसून येते.
“दर रविवारी बुध्द विहारात कां जावे व तिथे उपदेश ग्रहण कां करावा ?” या मागे डॉ. बाबासाहेबांचा काय उद्देश होता, ही बाब बौध्द समाजाने समजुन घेतलेली दिसत नाही असेच म्हणावे लागेल.
बुध्द विहार म्हणजे समाजाला जोडणारा एक महत्वाचा दूवा आहे. त्यामूळे समाजामध्ये एक मजबुत संघठन निर्माण होण्याची प्रक्रिया सुरु हो‍ईल. बंधुत्वाच्या, मैत्रिच्या नात्याने तो एकमेकांशी बांधल्या जाईल. त्यामूळे प्रत्येकांमध्ये आपुलकीची भावना निर्माण होण्यास मदत हो‍ईल. समाजामध्ये, कुटूंबामध्ये धम्ममय वातावरण निर्माण हो‍ईल. प्रत्येक जन धम्माच्या मार्गाने वाटचाल करतील. अन्याय, अत्याचाराच्या विरुध्द सामुहिकपणे उभे राहता येईल. विहारातील प्रबोधनामूळे बौध्द धम्माचे ज्ञान मिळेल. त्यामूळे बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारास मदत हो‍ईल. लहान मुले-मूली, विद्यार्थी-विद्यार्थिनी, युवक-युवती यांचेवर धम्माचे संस्कार होतील. त्यामूळे धम्माच्या मार्गाने वाटचाल करणारा एक आदर्श आणि जागृत पिढी निर्माण हो‍ईल.
नागपूर येथे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी धम्म दिक्षा दिल्यानंतर दूसर्‍या दिवशी नवदिक्षित बौध्द समाजाला मार्गदर्शन करतांना डॉ. बाबासाहेब म्हणाले होते की, “मात्र तूमचीही जबाबदारी मोठी आहे. तुमच्याबद्द‍ल इतर लोकांना आदर वाटेल, मान सन्मान वाटेल अशी तुम्ही कृती केली पाहिजे. हा धर्म म्हणजे आपण एक गळ्यात मढे अडकवून घेत आहोत असे मानू नका. बौध्द धर्माच्या दृष्टीने भारताची भूमी सध्या शुन्यवत आहे. म्हणून आपण उत्तम रितीने धर्म पाळण्याचा निर्धार केला पाहिजे. नाही तर महार लोकांनी तो निंदाजनक स्थितीस आणला असे हो‍ऊ नये, म्हणून आपण दृढ निश्‍चय केला पाहिजे. हे आपल्याला साधले तर आपण आपल्या बरोबर देशाचा, इतकेच नव्हे तर जगाचाही उध्दार करु. कारण बौध्द धर्मानेच जगाचा उध्दार होणार आहे.”
“बुध्द विहारामध्ये जावे व तिथे उपदेश ग्रहण करावा.” या विचाराच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजामध्ये सामाजिक व धार्मिक क्रांती घडऊन आणायचे उद्दिष्ट ठरविले होते असे दिसते. सामाजिक आणि धार्मिक क्रांती नंतरच राजकिय क्रांती घडून येण्यास मदत होते असे विचार “जातीचे निर्दालन ” (Annihilation of Cast) या पूस्तकात उदाहरणासह मांडले आहेत. असे राजकिय परिवर्तन टिकाऊ असते. म्हनून भारत बौध्दमय करणे व शासनकर्ती जमात बनणे हया दोन्हीही संकलप्‍ना पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टिने त्यांनी आखनी केली होती असे दिसते.
म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समाजामध्ये अपेक्षित असलेला असा बदल बुध्द विहारामध्ये दर रविवारी प्रत्येक बौध्दाने जाऊन व तिथे प्रबोधन ऎकून हो‍ऊ शकतो हे निश्चित आहे. आपल्या उत्तम कृतीमूळे व आदर्शवत धम्म पालन केल्यामूळे इतरही समाजातील लोकं आपला आदर्श घेऊन ते सुध्दा बौध्द धम्माकडे आकर्षित होतील. त्यामूळे डॉ. बाबासाहेबांच्या संकल्पनेनूसार ’भारत बौध्दमय’ होण्यास निश्चितच वाटचाल सूरु हो‍ईल.
यातूनच बुध्दीवादी, त्यागी, निष्ठावान,प्रामाणिक, समाजाभिमूख, समाजाप्रती दायित्व व सामाजिक बांधिलकी भावणा जोपासणारा आदर्श असा वर्ग निर्माण हो‍ऊन डॉ. बाबासाहेबांच्या “शासनकर्ती जमात बनण्याच्या” या दूसर्‍या संकल्पनेनूसार समाजाची वाटचाल सूरु हो‍ईल.
मा.कांशिरामजी म्हणायचे की,” बिकाऊ समाज मे बिकाऊ नेता पैदा होते है” आज आपण पाहतो की, निवडणूकीमध्ये मतदानाच्या ऎवजी मतविक्रीचे स्वरुप आले आहे. म्हणून न विकणारा समाज निर्माण करण्यासाठी व शासनकर्ती जमात बनण्यासाठी समाजाचे राजकिय प्रबोधन होणे तितकेच महत्वाचे आहे.
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी धम्म दिक्षा दिल्यानंतर ज्या २२ प्रतिज्ञा दिल्यात. त्या विहारामध्ये उपस्थिताकडून वदऊन घेतल्यामूळे हिंदू धर्मातील संस्कार व चालिरीतींना निश्चितच अटकाव निर्माण हो‍ईल. हिंदू धर्माने पेरलेली अंधश्रध्दा दूर होण्यास मदत तर होईलच त्याशिवाय बुध्दाच्या शिकवणीनुसार पंचशिल, अष्टांगिक मार्ग व दहा पारमिताचे पालन होईल.
तसेच पूजापाठ व प्रार्थणा झाल्यानंतर प्रत्येक विहारामध्ये प्रबोधन होत असल्यामूळे मोठ्या प्रमाणात प्रबोधनकारांची गरज भासेल. त्यामूळे प्रबोधनकारांची एक मोठी फौज निर्माण हो‍ऊ शकेल. समाजामध्ये आज मोठ्या प्रमाणात डॉ. बाबासाहेबांच्या चळवळीमूळे बूध्दिजिवी वर्ग तयार झालेला आहे. जो प्राध्यापक-शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांना शिकवितात त्यांनी आता समाजाला सूध्दा शिकविण्याची जबाबदारी घ्यावी. जो डॉक्टर्स वर्ग रोग्यांची काळजी घेतो त्यांनी आता समाजाची सूध्दा काळजी घ्यावी. जो ईंजिनिअर्स वर्ग बांधनी करतो त्यांनी आता समाजाची सूध्दा बांधनी करावी. व्यावसायीक , नोकरीदार, निवृत, साहित्यिक असा फार मोठा वर्ग समाजामध्ये वावरतो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की, “ज्या समाजामध्ये १० वकील,२० डॉक्टर्स व ३० ईंजिनिअर्स असतील तो समाज मी प्रगल्भ समजतो.” आज समाजामध्ये हजारो वकील, डॉक्टर्स व ईंजिनिअर्स निर्माण झालेले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेनूसार समाजाने आज प्रगल्भावस्था धारण केलेली आहे. याशिवाय आज मंत्रालयात सचिवापर्यंत पोलिस खात्यात जिल्हा अधिक्षका पर्यंत, जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकार्‍या पर्यंत, तहसिल कार्यालयात तहसिलदारा पर्यंत पंचायत समिती, जिल्हापरिषद, विद्यूत मंडळ व ईतर अशा अनेक सरकारी-निमसरकारी खात्यामध्ये मोठ-मोठ्या पदावर बुध्दिजिवी वर्ग काम करीत आहेत. हा वर्ग आंबेडकरी चळवळीचा लाभार्थी असून समाजातील तो मलईदार वर्ग आहे. राखीव जागेच्या माध्यमातून या वर्गाचा नोकरीमध्ये शिरकाव झाल्यामूळे तो समाजाचे प्रतिनिधित्व करीत आहे. त्यामूळे निव्वळ आप-आपल्या घरामध्ये गूंतुन न राहता, समाजाची परतफेड करणे ही त्यांची जबाबदारी आहे. म्हणून या वर्गांनी आंबेडकरी चळवळीचा, धम्माचा अभ्यास करुन समाजाचे प्रबोधन करणे हे त्यांचे कर्तव्य ठरते. कारण हाच वर्ग शिकलेला असल्यामूळे समजून घेऊन ईतरांना समजाऊन सांगू शकतो. “धर्म प्रचार करणारे विद्वान लोक नसतील तर धर्माला ग्लानी येते. ज्ञानी माणसांनी धम्म ज्ञान सांगीतले पाहिजे” असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्माला ग्लानी येण्याचे दूसरे कारण नागपूर येथे धमादिक्षेनंतर सांगितले होते.
ज्यांचे मना मध्ये प्रबोधन करण्याची सुप्त ईच्छा असते, त्यांना या माध्यमातून संधी मिळेल. तो आंबेडकरी चळवळीचा, धम्माचा अभ्यास करेल. त्यांचे पूढे एक प्रकारचे वैचारीक पिठाचे दालन ऊपलब्ध हो‍ईल. अशा प्रकारे समाजामध्ये वैचारीक जागृतता निर्माण होईल. याचे लोन ईतर समाजापर्यंत जाऊन पोहचेल. तेव्हा ईतर समाजाला सत्य-असत्याची जानीव होईल. डॉ. बाबासाहेबांच्या म्हणण्यानुसार, गुलामांना गुलामगिरीची जानिव झाली की तो बंड करुन उठेल व तो समता, स्वातंत्र, बंधूत्व,व न्याय तसेच मानवतावाद, विज्ञाननिष्ठता व शांतीची शिकवण देणार्‍या धम्माकडे आकर्षित होतील यांत शंका नाही.
विहारात लहानापासून तर मोठ्यांपर्यंत प्रत्येकांनी नियमीत गेल्याने व तेथे प्रबोधन झाल्याने हे शक्य हो‍ऊ शकते. म्हणून याच दृष्टिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, “ प्रत्येक बौध्दाने आद्यकर्तव्य समजून दर रविवारी बुध्द विहारात जावे व तिथे उपदेश ग्रहण करावा. तसेच प्रत्येक गावांमध्ये बुध्द विहार निर्माण करुन त्यात सभा घेण्यासाठी सभागृह बांधावे.”
जिथे जिथे विहार नसतील, किवा अपूर्णावस्थेत पडून असतील त्या त्या ठिकाणी बुध्द विवाहाराची निर्मिती करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण धर्माला ग्लानी येण्याचे तिसरे कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे धमादिक्षेनंतर सांगितले ते असे की, “सर्वसामान्य लोकांसाठी मंदिर, विहार ऊपलब्ध नसणे.” कारण असे ठिकान सर्वसामान्य लोकांसाठी श्रध्देचे स्थान असते.
म्हणून यासाठी समाजाला पूढिल कामे हातात घेणे अत्यंत आवश्यक आहे.
१. जिथे विहार नसतील तेथे विहाराची निर्मिती करणे,
२. जिथे विहार अपूर्णावस्थेत असतील तेथे पूर्ण करणे,
३. दर रविवारी लोकांना विहारात जाण्यासाठी प्रवृत करणे, व
४. प्रबोधन करणारा वर्ग निर्माण करणे.
हे उद्दीष्ठ साध्य करण्याकरिता एका स्वतंत्र यंत्रनेची गरज आहे.
विहाराची निर्मिती किवा अर्धवट बांधलेल्या विहार पूर्ण करण्यासाठी खालील प्रमाणे योजना तयार करता येईल.
१. एक केंद्रीय निधी स्थापन करावा. सरकारी योजनेत जसे स्थानीक लोकांनी अंदाजित खर्चाच्या १० प्रतिशत निधी जमा केल्यास ऊरलेली रक्क्म सरकार देते. त्याचप्रमाणे केंद्रीय निधी ने ऊरलेल्या रकमेची तरतूद करुन विहाराचे बांधकाम पूर्ण करावे. यासाठी समाजातील श्रिमंत व दानशूर लोकांनी योगदान करावे. समाजातील प्रतिष्ठीत व प्रामाणिक लोकांकडे हे काम सुपूर्द करावे.
२. दर रविवारी लोकांना विहारात येण्यासाठी प्रवृत करणे, त्यासाठी एकत्र होण्याची विशिष्ठ वेळ ठरविणे, लोकांचे प्रबोधन करण्यासाठी प्रबोधनकार ठरविणे, त्यांना गावोगावी पाठविण्याची व्यवस्था करणे, प्रबोधनासाठी योग्य असे निरनिराळे विषय ठरवीणे, विषयाची आगाऊ माहिती प्रत्येक विहाराकडे पाठवीणे, त्यासाठी पूर्ण महिण्याची कार्यक्रम पत्रिका छापून ते गावोगावी वितरीत करण्याची व्यवस्था करणे, ईत्यादी कामे करण्यासाठी सुध्दा एका स्वतंत्र यंत्रनेची निर्मिती करावी लागेल.
तरी याबाबतीत समाजातील सूज्ञ व जागृत लोकांनी विचारविनिमय करुन वरिल योजना कार्यांन्वित करण्यासाठी किवा ईतर काही वैकल्पिक योजना असल्यास त्यांनी आपआपले मते समाजाच्या वृतपत्रांमध्ये मांडावीत, जेणे करुन “प्रत्येक बौध्दाने आद्यकर्तव्य समजून दर रविवारी बुध्द विहारात जावे व तिथे उपदेश ग्रहण करावा. तसेच प्रत्येक गावांमध्ये बुध्द विहार निर्माण करुन त्यात सभा घेण्यासाठी सभागृह बांधावे.” या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशाचे पालन करता येईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे, “माझा जयजयकार करण्यापेक्षा मी सांगितलेले कामे करा” या त्यांच्या उपदेशा प्रमाणे हे काम समाजाने एका सुत्रबद्द पध्दतीने व निष्ठापूर्वक रितिने करण्याचा निर्धार करावा अशी अपेक्षा व्यक्‍त करतो.
टिप-
१. सदर लेख ‘दैनिक वृतरत्न सम्राट’ मध्ये दि. २६.१२.२००९ रोजी प्रकाशित झाला.
२. तसेच ‘धम्मशासन’ मध्ये दि. १३.११.२००९ रोजी प्रकाशित झाला.
३. तसेच ‘डॅशिंग महा्राष्ट’ मध्ये दि. डिसेंबर २००९ रोजी प्रकाशित झाला.
४. तसेच ‘बहुजनरत्न लोकनायक’ मध्ये दि. १३.११.२००९ रोजी प्रकाशित झाला.
Advertisements

3 Responses to “बुध्द विहार निर्मिती व समाज प्रबोधन”

 1. milind r.halde January 16, 2011 at 9:07 PM #

  i am follow your right sugention

 2. Rajesh khandagale May 18, 2011 at 10:33 PM #

  It is a fact that we r not going to VIHAR on every sunday, that is our duty. follow babasaheb.

  • rkjumle May 19, 2011 at 2:06 PM #

   Thank you very much for your comments, Rajesh

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: